MCC NEET MDS 2024 : कौन्सिलिंगसाठी आजपासून नोंदणी सुरु

इच्छुक उमेदवार mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म सबमिट करू शकतात.

MCC NEET MDS 2024 : कौन्सिलिंगसाठी आजपासून नोंदणी सुरु

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) आज राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश चाचणी (NEET MDS) 2024 मास्टर ऑफ डेंटल सर्जरीसाठी समुपदेशनासाठी (counselling) नोंदणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म सबमिट करू शकतात.

NEET MDS समुपदेशन 2024 ची पहिली फेरी 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. तर १ ऑगस्टपासून वर्ग सुरू होतील. MCC NEET MDS समुपदेशनाच्या तीन फेऱ्या होतील. NEET MDS  दुसऱ्या फेरीचे समुपदेशन 22 जुलैपासून सुरू होईल.

उमेदवार 2 जुलै ते 7 जुलै रात्री 11:55 वाजेपर्यंत NEET MDS समुपदेशनासाठी नोंदणी करू शकतात. 7 जुलै रोजी दुपारी 4:00 ते रात्री 11:55 पर्यंत, उमेदवारांना अभ्यासक्रम आणि महाविद्यालयासाठी त्यांची निवड लॉक करून त्यांच्या निवडीची पुष्टी करावी लागेल.

NEET MDS 2024: समुपदेशनासाठी पात्रता निकष

उमेदवारांनी मान्यताप्राप्त दंत महाविद्यालयातून बीडीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. त्यांनी NEET MDS 2024 ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, जून 30, 2024 पर्यंत त्यांनी  एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे.

NEET MDS 2024 स्कोअरकार्ड,  प्रवेशपत्र पात्रता परीक्षा प्रमाणपत्र, कॉलेज प्रमाणपत्र, दंत परिषदेने दिलेले इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, बारावीची गुणपत्रिका, वैध सरकारी ओळख पुरावा, जात प्रमाणपत्र, असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक असणार आहे.   

NEET MDS 2024: नोंदणी कशी करावी ? 

सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जावे. त्यानंतर एमडीएस समुपदेशन विभागात जावे आणि नोंदणीसाठी लिंकवर क्लिक करावे. आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि पोर्टलवर नोंदणी करा. आता लॉगिन करा आणि अर्ज भरा. कागदपत्रे अपलोड करा, नोंदणी शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा त्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.