अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर ; आजपासूनच ऑनलाईन नोंदणी

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना २४ जून ते ३ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर  ; आजपासूनच ऑनलाईन नोंदणी
engineering admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell) प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी ( engineering admission) व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर ( engineering admission timetable declared ) झाले आहे. विद्यार्थ्यांना २४ जून ते ३ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेल च्या www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


    सीईटी सेलच्या माध्यमातून विविध व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. एमएच- सीईटी परीक्षेचा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला. त्यानंतर पुढील काही दिवसात प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. परंतु,  सीईटी सेलकडून विलंब केला जात होता. विद्यार्थी व पालक अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक केव्हा प्रसिध्द होते, या प्रतीक्षेत होते.मात्र,  राज्यातील खाजगी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत, यासाठीच  सीईटीसेल कडून प्रवेशास विलंब केला जात असल्याचा आरोप होत होता.अखेर उशिरा का होईना सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
   

विद्यार्थ्यांना २४ जून ते ३  जुलै २०२३ या कालावधीत प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहेत. त्याचप्रमाणे २४ जून ते येत्या ४ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी सबमिट केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये नोंदणी शुल्क असून आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये शुल्क आहे .तर एनआरआय, पीआयओ कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी ५ हजार रुपये शुल्क आहे.