SSC Exam : पुरवणी परीक्षेसाठी बुधवारपासून अर्ज भरता येणार; राज्य मंडळाची माहिती

परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज माध्यमिक शाळांमार्फत भरावेत, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

SSC Exam : पुरवणी परीक्षेसाठी बुधवारपासून अर्ज भरता येणार; राज्य मंडळाची माहिती
SSC Supplementary Exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावीच्या (10th Result) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (SSC Board) पुरवणी परीक्षा (SSC Supplementary Exam) जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी दि. ७ ते १६ यादरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी दिली.

दहावीच्या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता यणार आहेत.

11th Admission : पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा, अन्यथा एका फेरीतून व्हाल बाद; सविस्तर माहिती व वेळापत्रक पहा...

परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने दहावीसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता येतील. विद्यार्थ्यांनादि. ७ ते १६ जून या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. तर १७ ते २१ जून या कालावधीत विलंब शुल्क भरून अर्ज करता येतील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.

परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज माध्यमिक शाळांमार्फत भरावेत. सर्व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना मार्च- २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाईन घेता येईल.

कौशल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थी थेट टाटा इन्स्टिट्युटमध्ये प्रवेशासाठी पात्र

परीक्षेला प्रथमतः प्रविष्ठ झालेल्या व श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४ अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील. नियमित, विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निधारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात आणि आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo