HSC Result : दिव्यांग विद्यार्थ्यांचे ‘दिव्य’ यश; एकूण निकालात आघाडी

एकूण दिव्यांग विद्यार्थ्यांमधून ९३.४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी एकूण ६ हजार ७२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी ५ हजार ६७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

HSC Result : दिव्यांग विद्यार्थ्यांचे ‘दिव्य’ यश; एकूण निकालात आघाडी
Students with Disabilities in HSC Rersult

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

(HSC Result Updates) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC Board) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत यंदाही दिव्यांग विद्यार्थ्यांनी (Students with disabilities) भरघोस यश मिळवले आहे. एकूण दिव्यांग विद्यार्थ्यांमधून ९३.४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी एकूण ६ हजार ७२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी ५ हजार ६७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (Maharashtra HSC Result)

राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एकूण ३ हजार ८०६ मुले आणि २ हजार २६६ मुलींनी ही परीक्षा दिली. यापैकी ३ हजार ५३८ विद्यार्थी आणि २ हजार १३५ विद्यार्थिनी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक अस्थी व्यंग असलेल्या १ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यापैकी १३९४ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

बारावीच्या निकालानंतर टेन्शन आलंय? एका कॉलवर बोर्डाचे समुपदेशक घालवतील भीती

अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांनंतर सर्वाधिक १ हजार ४३ अंध विद्यार्थी आहेत. यापैकी ९८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ९४७ कर्णबधिर विद्यार्थ्यांपैकी ८९४ विद्यार्थी पास झाले आहेत. तर ठराविक गोष्टी शिकण्यास असक्षम असलेल्या ९२६ विद्यार्थ्यांपैकी ८९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

त्याचप्रमाणे ३५ दिव्यांग विद्यार्थी, बौद्धिक अपंगत्व असलेले ३४४ विद्यार्थी, बहुअपंगत्व असलेले ४७ विद्यार्थी, बौद्धिक दृष्ट्या अक्षम असेलेले १३१ विद्यार्थी, ऑटिझम ३७ विद्यार्थी, सेरेब्रल पाल्सी १७७ विद्यार्थी, स्नायूंची विकृती असलेले ६७ विद्यार्थी, मज्जातंतू अशक्तपणा ७८ विद्यार्थ्यांनीही परीक्षेत यश मिळवले आहे.

औरंगाबादमधील 'त्या' ३७२ विद्यार्थ्यांचा निकालही जाहीर; बोर्डाला पेपर तपासताना करावी लागली कसरत

गतिमंद १९१ विद्यार्थी, मल्टिपल स्किलॉरिसिस असलेले १, स्पीच अँन्ड लँग्वेज डिसॅबलिटी असलेले ३३ विद्यार्थी, थॅलेसेमिया ३५ विद्यार्थी, हिमोफिलिया असलेले २२ विद्यार्थी, सिकलसेल ९० विद्यार्थी, ऍसिड हल्ला झालेले ५ विद्यार्थी, पार्किन्सन्स असलेले १ आणि इतर अपंगत्व असलेल्या २४७ विद्यार्तीही यशस्वी ठरले आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo