सीएचबी तासिका आता ६० मिनिटांची ; मानधनात ९०० रुपये वाढ               

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना आता ४८ / ५० मिनिटांची नाही तर आता ६० मिनिटांची एक तासिका करण्यात आला आहे. तसेच मानधनात ६२५ वरून ९०० रुपये मानधन वाढ करण्यात आली आहे.

सीएचबी तासिका आता ६० मिनिटांची ; मानधनात ९०० रुपये वाढ               

  उच्च शिक्षण संचालनालयाच्या (director of higher education) अधिपत्याखालील शासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील (granted college) तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना (chb professor) आता ४८ / ५० मिनिटांचा नाही तर आता ६० मिनिटांचा एक तास करण्यात आला आहे. तसेच मानधनात ६२५ वरून ९०० रुपये मानधन वाढ करण्यात आली आहे. कला संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील सीएसबी पदाच्या मानधन वाढीनंतर उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील सीएचबी पदावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला.

   राज्यातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी विविध संघटनांनी आंदोलन केले होते. त्यावर राज्याचे तत्कालीन उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मानधनात वाढ करण्याची शिफारस केली होती. अखेर कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ९०० रुपये व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी १ हजार रुपये मानधन वाढविण्यात आले आहे.

 सीएचबी प्राध्यापकांना यापूर्वी ४८ किंवा ५० मिनिटांचा एक तास देण्यात आला होता. त्यामुळे शासन अध्यादेशानुसार ६२५ रुपये मानधन असले तरी कालावधी कमी तास घेतला जात असल्याने त्यांच्या ६२५ रुपयांच्या मानधनातून काही रक्कम वजा करून घेतली जात होती. त्यामुळे वेळेच्या बाबत स्पष्टता असावी, अशी मागणी महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेकडून करण्यात आली होती. राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात एक तासिका सात मिनिटांची असेल, असे स्पष्ट केले आहे.