इयत्ता अकरावीची दुसरी निवड यादी जाहीर; प्रवेश निश्चित करण्यासाठी महत्वाच्या टीप्स

पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, अमरावती, नागपूर व नाशिक या शहरांमधील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

इयत्ता अकरावीची दुसरी निवड यादी जाहीर; प्रवेश निश्चित करण्यासाठी महत्वाच्या टीप्स
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या शिक्षण विभागाने (Education Department) इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची (11th Admission) दुसरी निवड यादी सोमवारी सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात आली. दुसऱ्या फेरीमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील २० हजार ६०७ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी  निवडण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना येत्या ५ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. (Centralised Admission Process)

पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, अमरावती, नागपूर व नाशिक या शहरांमधील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या निवड यादीमध्ये पुण्यातील ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. त्यापैकी केवळ २३ हजार ४०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

राज्यातील ITI च्या जागांवर इतर विभागांचा डोळा; शिंदे सरकारला काढावा लागला जीआर

दुसऱ्या फेरीसाठी पुण्यातील  ६५ हजार ९३३ जागा कॅप राऊंडसाठी उपलब्ध आहेत. कॅप राऊंडप्रमाणेच कोटा प्रवेशाची निवड यादीही जाहीर करण्यात आली आहे. मुंबईमध्ये दुसऱ्या फेरीत ७५ हजार ८९६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर नागपूरमध्ये ७ हजार २४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक आणि अमरावतीमध्ये अनुक्रमे ४ हजार ८९० आणि २ हजार ६९७ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार निवडण्यात आले आहे.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दि. ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेशासाठी जाण्याआधी विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

काही महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात –

  • प्रवेशाला जाण्यापुर्वी आपली सर्व कागदपत्रे लॉगीनमध्ये अपलोड करावीत
  • अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास, प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश येथे निश्चित करावा.
  • अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर असे विद्यार्थी पुढील फेरीची वाट पाहू शकतील.
  • ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय अलॉट झालेले आहे, त्यांनी तेथेच घेणे अनिवार्य आहे.
  • प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल.
  • एखाद्या विद्यार्थ्याला त्यांचा निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असेल, तर त्यासाठी संबंधित विद्यालयास विनंती करून आपला प्रवेश रद्द करून घेता येईल, असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थीही पुढील एका नियमित फेरीसाठी प्रतिबंधित होतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2