बारावीच्या निकालानंतर टेन्शन आलंय? एका कॉलवर बोर्डाचे समुपदेशक घालवतील भीती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

बारावीच्या निकालानंतर टेन्शन आलंय? एका कॉलवर बोर्डाचे समुपदेशक घालवतील भीती
HSC Result Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result) गुरूवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (HSC Website) निकाल पाहता आला. निकालानंतर काही विद्यार्थी मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असल्याने मंडळाकडून ऑनलाईन समुपदेशनाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. (Maharashtra HSC Result)

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. निकालानंतर विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी दरवर्षी समुपदेशन केले जाते. त्याचा हजारो विद्यार्थी लाभही घेतात.

निकालाबाबत अडचणी आल्यास थेट बोर्डात करा फोन; सहा दुरध्वनी क्रमांक जारी

यावर्षीही मंडळाकडून ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मंडळाने दहा भ्रमणध्वनी प्रसिध्द केले असून या क्रमांकावर विद्यार्थी किंवा पालकांना संपर्क साधून मार्गदर्शन घेता येईल. परीक्षेच्या निकालाच्या दिवसांपासून पुढील ८ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन मिळेल.

समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे -

 १) ७३८७४००९७०       २) ९४०४६८२७१६

३) ८३०८७५५२४१       ४) ९३७३५४६२९९

५) ९८३४९५१७५२       ६) ८९९९९२३२२९|

७) ८४२११५०५२८       ८) ९३२१३१५९२८

९) ७३८७६४७९०२       १०) ८७६७७५३०६९

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo