औरंगाबादमधील 'त्या' ३७२ विद्यार्थ्यांचा निकालही जाहीर; बोर्डाला पेपर तपासताना करावी लागली कसरत

इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. परंतु, राज्य मंडळांनी या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे.

औरंगाबादमधील 'त्या' ३७२ विद्यार्थ्यांचा निकालही जाहीर; बोर्डाला पेपर तपासताना करावी लागली कसरत
HSC Result Updates

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Maharashtra HSC Result : इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत (Answer Sheet) एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. परंतु, राज्य मंडळांनी या विद्यार्थ्यांचा निकाल (HSC Result) जाहीर केला आहे. या संदर्भातील पोलीस तपास सुरू असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (HSC Board) अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosawi) यांनी सांगितले.     

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद गोसावी यांनी औरंगाबाद विभागात घडलेल्या गैरव्यवहार प्रकरणी माहिती दिली. उत्तरपत्रिकेत अज्ञात व्यक्तीने लिहिलेली उत्तरे वगळून संबंधित विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरांनाच गुण देण्यात आले आहेत. हे गुण गृहित धरून त्यांचा निकाल लावण्यात आलेला आहे.

निकालाबाबत अडचणी आल्यास थेट बोर्डात करा फोन; सहा दुरध्वनी क्रमांक जारी

गोसावी म्हणाले, औरंगाबाद विभागातील २३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे समोर आले. या संदर्भातील माहिती प्राप्त झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. त्यात विद्यार्थी सहभागी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात ४८ महाविद्यालयांचा कला व विज्ञान शाखेचा निकाल शून्य

प्राथमिक चौकशीमध्ये संशयित असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भातील पोलीस तपास सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. उत्तर पत्रिकेत दुसऱ्या व्यक्तीने लिहिण्याचा प्रकार कस्टडी ते नियमक यादरम्यान घडला असल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2