वा रे पठ्ठ्या ! बनवट गुणपत्रिका दाखवून शिपायाने न्यायालयाचीच केली फसवणूक : न्यायाधीश यांनीच केला भांडा फोड 

दहावीच्या परीक्षेत 99.7 गुण मिळवल्यानंतर तो कोर्टातील शिपाई भरती परीक्षेला बसला आणि कोर्टात शिपायाच्या पदासाठी त्याची निवड झाली.पण न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संशयावरून हे प्रकरण उघडकीस आले.

वा रे पठ्ठ्या ! बनवट गुणपत्रिका दाखवून शिपायाने न्यायालयाचीच केली फसवणूक : न्यायाधीश यांनीच केला भांडा फोड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

न्यायालयात सफाई कामगाराची नोकरी (Court sweeper job)करणारा व्यक्ती दहावीची परीक्षा देऊन त्यात 99.7 टक्के गुण मिळवतो. न्यायालयात शिपायची नोकरी पटकवतो. पण त्या न्यायालयाच्या न्यायाधीशानाच (the judge) त्या शिपायावर संशय येतो. त्याच्या गुणपत्राची खोलात चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर येतो. कारण त्या सफाई कामगाराने बनवट मार्कशीट (fake mark sheet) दाखवल्याचे सिद्ध झाले आहे. कर्नाटकच्या न्यायालयात (Court of Karnataka)हा प्रकार उघड झाला आहे. 

सफाई कामगार लक्ष्मीकांत लोकरे हा कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील कोप्पल कोर्टात सफाई कामगार म्हणून काम करत होता. त्याने नोकरी करत असताना 10 वी ची परीक्षा दिली. 10वीच्या परीक्षेत 99.7 गुण मिळवल्यानंतर तो कोर्टातील शिपाई भरती परीक्षेला बसला आणि कोर्टात शिपायाच्या पदासाठी त्याची निवड झाली.पण न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संशयावरून हे प्रकरण उघडकीस आले.

प्राप्त माहितीनुसार, न्यायालयाच्या न्यायाधीशांनी लक्ष्मीकांत लोकरे यांच्या या कामगिरीवर संशय व्यक्त केला. कारण लोकरे यांना नीट  लिहिता किंवा वाचता येत नव्हते. संशय येऊन न्यायाधीशांनी याबाबत वैयक्तिक तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. या भरतीमध्ये समाविष्ट असलेल्या इतर उमेदवारांचीही चौकशी करण्यात यावी, जेणेकरुन त्यांना ही नोकरी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मिळाली आहे की फसवणूक केली आहे, हेही कळू शकेल, असेही न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

तपासादरम्यान लक्ष्मीकांत लोकरे याने पोलिसांना सांगितले की, "त्याने सातवीनंतर थेट दहावीच्या परीक्षेला प्रवेश घेतला. ज्यामध्ये त्याला 625 पैकी 623 गुण मिळाले आहे. लक्ष्मीकांत लोकरे यांनी दावा केला की, ते 2017-18 मध्ये 10वीची परीक्षा खासगी उमेदवार म्हणून बसले होते. ही परीक्षा दिल्ली शिक्षण मंडळाने घेतली होती आणि ही परीक्षा बागलकोट जिल्ह्यात घेण्यात आली होती."