शाळांच्या वेळा सकाळी लवकरच हव्यात ; पालकांचा वेळ बदलण्यास कडाडून विरोध

शाळांच्या वेळा सकाळी लवकरच हव्यात ; पालकांचा  वेळ बदलण्यास कडाडून विरोध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शासनाने शाळांच्या वेळात बदल करण्याचा निर्णय (Decision to change school timings)घेतला असला तरी अनेक पालकांना हा निर्णय मान्य नसल्याचे (Parents do not agree with the decision)दिसून येत आहे.बहुतांश पालकांचा शाळेच्या वेळा बदलण्यास विरोध असून रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्ही पाहण्याची सवय (Mobile and TV watching habit)लावण्यापेक्षा लवकर उठण्याची सवाल लावणे कधीही चांगले,असे पालकांचे म्हणणे आहे. त्याचाप्रमाणे शाळेच्या वेळा बादलल्यास स्कूल बसचे अतिरिक्त भाडे (Additional fare for school bus)पालकांच्या खांद्यावर पडणार आहे.त्यामुळे शासनाने शाळांच्या वेळेत बदल करू नये,अशी भूमिका पालक घेताना दिसत आहेत. 

बदलत्या जीवनशैलीमुळे पालक व मुले उशीरा झोपतात.त्यामुळे सकाळी शाळेसाठी लवकर उठल्यावर त्यांची झोप पूर्ण होत नाही.परिणामी सकाळी शाळेत लवकर आल्यावर मुलांचे अभ्यासाकडे नीटपणे लक्ष लागत नाही.तसेच पालकांची सुध्दा ओढाताण होते.त्यामुळे शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण  विभागाने घेतला. तसेच त्यासंदर्भात अध्यादेशाही प्रसिध्द केला. मात्र, या निर्णयावर सर्व प्रथम स्कूल बस चालकांनी आक्षेत घेतला.तसेच शाळेच्या वेळा एकाच वेळी असतील तर स्कूल बसच्या शूलकात वाढ करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.त्यामुळे शाळेच्या वेळेत बदल करू नये,अशी मागणी स्कूल बस असोसिएशनतर्फे केली जात आहे. त्यातच आता पालकही शाळा व्यवस्थापनाशी संपर्क करून शाळेच्या वेळेत बदल करू नये,अशी मागणी करत आहेत. परिणामी शाळांच्या वेळेबाबत शिक्षण विभागाला लवचिक भूमिका घ्यावी लागेल,असे दिसून येत आहे. 

-----------------

शासनाने पालकांना विचारून निर्णय घेणे अपेक्षित होते.सकाळी नऊनंतर शाळेत पाठवण्यास आम्ही तयार नाही.आराम करण्यास आयुष्य पडले आहे.सकाळी लवकर मुले शाळेतून जाऊन आली तर अभ्यास आणि इतर कामांसाठी त्यांना वेळ मिळू शकतो. त्यामुळे शाळेच्या वेळेत कोणताही बदल करू नये.पूर्वीप्रमाणेच शाळेची वेळा ठेवावी.विनाकारण पालक आणि विद्यार्थी यांचे पूर्वीपासून तयार झालेले शेड्यूल बिघडवू नये.

-रुबिना सय्यद , पालक, प्रियदर्शनी स्कूल 

---------------------------
 मुलांना सकाळी सात वाजता शाळेत पाठवणे योग्य आहे. शाळेत लवकर जायचे म्हणून मुलं वेळेवर झोपतात. तसेच सकाळी शाळेत जाऊन आल्यानंतर इतर उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. त्यामुळे अगदी लहान मुलांसाठी हा निर्णय योग्य असला तरी मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शाळेत बदल करण्याची गरज नाही.त्यामुळे सकाळी सात वाजताच शाळा असली पाहिजे.

 - प्रतिभा पवार , पालक , 

-------------------------------

शालेय वयातच विद्यार्थ्यांना शिस्त लागते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांना विनाकारण जागे ठेवणे योग्य नाही. तसेच मुलं मोबाईल किंवा टीव्ही पाहतात. त्यामुळे शाळेच्या वेळेत बदल करणे संयुक्तिक नाही. मुलांची झोप पूर्ण झाल्यानंतर सकाळी जास्तीत जास्त साडेसात वाजेपर्यंत शाळेची वेळ असावी.उशीरा शाळा भरली तर शाळा उशीरा सुटेल.त्यामुळे विद्यार्थ्यांना क्लास किंवा इतर  अॅक्टीव्हिटीसाठी वेळा मिळणार नाही.ही बाब शासनाने विचारात घ्यायला हवी.

- प्रीती मिंडे,पालक 
-------------------------------------

मुलांनी लवकर उठावे, लवकर तयार होऊन अभ्यास करावा, शाळेतून परत आल्यावर अभ्यास करावा आणि लवकर झोपावे, हाच विद्यार्थ्यांचा दिनक्रम असला पाहिजे. तेव्हाच पुढे जाऊन त्यांना चांगल्या सवयी लागतील. तसेच पालकांना विचारून शासनाने हा निर्णय घेतला नाही. पालकांनी आपल्या नोकरीनुसार मुलांच्या शाळांच्या वेळेचा ताळमेळ घातलेला असतो. एका मुलाला शाळेची एक वेळ आणि दुसऱ्या मुलाला दुसरी वेळा असे झाल्यास पालकांचे सर्व नियोजन कोलमाडेल तसेच स्कूल बसच्या फी चा भारही त्यांच्यावर पडेल. त्यामुळे शासनाने शाळेच्या वेळेत बदल करू नये. पालकांना त्यांच्या वेळेप्रमाणे मुलांना शाळेत पाठवण्याची मुभा द्यावी.

- दिलीपसिंग विश्वकर्मा, अध्यक्ष , महापॅरेंट्स  
------------------------------------------