सुधाकर जाधवर यांची प्राचार्य पदाची याचिका न्यायालयाने फेटाळली; तरीही विद्या परिषदेचे सदस्यत्व राहणार अबाधित

६२ वर्षानंतर पुढे ३ वर्षांचा कालावधी वाढून मिळावा, यासाठी जाधवर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केले होती.

सुधाकर जाधवर यांची प्राचार्य पदाची याचिका न्यायालयाने फेटाळली; तरीही विद्या परिषदेचे सदस्यत्व राहणार अबाधित
Dr. Suhakar Jadhavar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वडगाव येथील चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण आणि क्रीडा महामंडळ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर आणखी तीन वर्षे मुदतवाढ देण्याबाबत डॉ. सुधाकर जाधवर (Dr. Sudhakar Jadhavar) यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळून लावली आहे. त्यामुळे जाधवर यांच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) अधिकार मंडळातील सदस्यत्वावर गदा येणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्यावर जाधवर यांनी उत्तर शोधले आहे.

डोंगराळ भागातील महाविद्यालयांसाठी प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे करण्यात आली आहे. त्यानुसार ६२ वर्षानंतर पुढे ३ वर्षांचा कालावधी वाढून मिळावा, यासाठी जाधवर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केले होती. जाधवर हे शिवछत्रपती कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते.

उच्च शिक्षण सहसंचालकांवर प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षांनी टाकला दबाव ? ; पोलिसांकडे लेखी तक्रार

वयाच्या ६२ व्या वर्षी ६ जून २०२४ रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे आणखीन तीन वर्ष प्राचार्य पदावर काम करण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण आणि क्रीडा मंडळ तसेच राज्य शासन आणि पुणे विद्यापीठ यांना प्रतिवादी केले होते. प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते विद्यापीठ अधिकार मंडळातील पदावर राहण्यास पात्र ठरत नाही. त्यामुळे शिवछत्रपती कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील कार्यकाल संपल्यानंतर जाधवर हे दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाले.

सेवेत खंड पडू दिला नाही

न्यायालयाने प्राचार्य पदाच्या मुदत वाढीची याचिका फेटाळली असली तरी सेवेत एकही दिवस खंड पडू न देता मी दुसऱ्या एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो आहे. या संदर्भातील माहिती विद्यापीठ प्रशासनाला कळविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ अधिकार मंडळातील पदावर कोणत्याही प्रकारची गदा येत नाही.
- डॉ. सुधाकर जाधवर, सदस्य, विद्या परिषद ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD