पुण्यात मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग; इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुटका

अग्नीशमन दलाच्या जवानांना सर्व मुलींना शेजारील इमारतीरून शिडीच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनार्थ टळला आहे. 

पुण्यात मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग; इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुटका

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील कुमठेकर रस्त्यानजीक (Pune Kumthekar Road) असलेल्या एका चार मजली इमारतीला भीषण आग (The building caught fire) लागली. या आगीत जीव गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुटका (Rescue of 48 girls) करण्यात आली. अग्नीशमन दलाच्या जवानांना सर्व मुलींना शेजारील इमारतीवरून शिडीच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यामुळे मोठा अनार्थ टळला. 

मिळालेल्या माहितीनुसार  पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका इमारतीत खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर अभ्यासिका तर दुसऱ्या मजल्यावर स्टडी रूम आणि इतर दोन मजल्यावर या इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून काही वेळातच आग विझवण्यात यश आले. 

आग लागली त्यावेळी या इमारतीत ४८ मुली राहत होत्या. तळमजल्यावर आग लागल्याने घाबरून तिथे राहत असलेल्या मुलींनी टेरेसवर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व मुलींना शेजारील इमारतीवरून शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले. मात्र, त्या ठिकाणी काम करत असलेल्या सागर या तरूणाचा या आगीमुळे गुदमरून मृत्यू झाला. आग कशामुळे लागली ते अद्याप समजू शकलेले नाही.