अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. न्यूझीलंडमध्ये वैद्यकीयची पदव्युत्तर पदवी घेण्याची संधी
भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) जगातील प्रतिष्ठित फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन (WFME) ची मान्यता प्राप्त केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतातील एमबीबीएस (MBBS) विद्यार्थ्यांना आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंडला या देशांमध्ये जाऊन पदव्युत्तर पदवीचे (PG) शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) जगातील प्रतिष्ठित फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन (WFME) ची मान्यता प्राप्त केली आहे. यामुळे देशातील सर्व ७०६ वैद्यकीय महाविद्यालये आणि पुढील १० वर्षांत सुरू होणार्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना WFME मान्यता मिळेल.
या मान्यतेमुळे भारतीय वैद्यकीय पदवीधरांना जगात कुठेही आपले करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये जाऊन पदव्युत्तर प्रशिक्षण आणि सराव घेऊ शकतात. इतर देशांमध्ये प्रशिक्षण आणि सरावासाठी WFME ची मान्यता आवश्यक आहे. आता विद्यार्थी भारतीय पदवी घेऊन परदेशात सराव करू शकतात.
ABVP : दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत ‘अभाविप’चा मोठा विजय
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ही मान्यता भारतीय वैद्यकीय संस्था आणि व्यावसायिकांची आंतरराष्ट्रीय ओळख आणि प्रतिष्ठा वाढवेल, शैक्षणिक सहयोग आणि देवाणघेवाण सुलभ करेल आणि वैद्यकीय शिक्षणात सतत सुधारणा आणि नवकल्पना आणि वैद्यकीय शिक्षक आणि संस्थांमध्ये गुणवत्तेची हमी आणि प्रोत्साहन देईल.
WFME च्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला सुमारे ५ कोटी रुपये शुल्क WFME ला भरावे लागतील. यामध्ये साईट व्हिजिट टीमचा खर्च आणि त्यांचा प्रवास, निवास आणि बोर्डिंग यांचा समावेश आहे. WFME ही एक जागतिक संस्था आहे जी जगभरात वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ओळखली जाते.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com