11th Admission : अकरावीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीस सुरूवात

विद्यार्थ्यांना ३ जुलैपासून ते ६ जुलैपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

11th Admission : अकरावीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीस सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे (State Department of Education) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता ११ वी प्रवेशाची (11th admission) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया(Online admission process) राबवली जात असून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका(Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporation) कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या पहिल्या फेरीतून (first round) २५,३७२ विद्यार्थ्यांनी (Students) प्रवेश घेतला आहे.  आता दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून (filling the application form) घेतले जात आहेत. तसेच त्यांच्याकडून पसंतीक्रम(order of preference) नोंदवून घेतले जात आहेत. या विद्यार्थ्यांना ३  ते ६ जुलैपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

आतापर्यंत कॅप राउंडनुसार, २०,५६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून इनहाउस कोट्यातून २,८९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर व्यवस्थापन कोट्यातून केवळ १७७ इतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे. अल्पसंख्याक कोट्यातून १,७३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण ९३,८१७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी ६६,९३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

यातील कला शाखेसाठी १४,७७८ जागांपैकी केवळ ५,१९७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. वाणिज्य शाखेसाठी ३६,७२६ जागांपैकी २३,२५१ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकरिता सर्वाधिक म्हणजेच ३९,२६५ जागांपैकी ३७,९२१ तर एचएसवीसी या अभ्यासक्रमासाठी ३,०४८ जागांपैकी केवळ ५६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.  

दरम्यान, दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. तसेच, ३ जुलैला सकाळी १० वाजल्यापासून ते ६ जुलै रात्री १० वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. तसेच महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. याशिवाय या प्रवेश प्रकियेत सुरुवातीपासूनच समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंतीक्रम बदलता येतील, अन्यथा मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहणार आहेत.