ॲम्बी व्हॅलीत शिक्षण विभागाची कार्यशाळा की इव्हेंट मॅनेजमेंट शो?

ही कार्यशाळा कमी खर्चात पुणे किंवा मुंबईत घेता आली असती. त्यासाठी लोणावळ्यात लाखो रुपयांची उधलपट्टी कशासाठी?, असा सवाल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा दिपाली सरदेशमुख यांनी केला आहे.

ॲम्बी व्हॅलीत शिक्षण विभागाची कार्यशाळा की इव्हेंट मॅनेजमेंट शो?
Workshop in Aamby vally city Lonavala

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

लोणावळा येथील द ॲम्बी व्हॅली सिटी (Aamby Vally City) येथे शालेय शिक्षण विभागाची (Education Department) दोन दिवसीय निवासी कार्यशाळा शुक्रवार व शनिवारी पार पडली. ‘स्टार्स’ व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या  (NEP 2020)प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने या कार्यशाळेत विचारमंथन करण्यात आले. पण आता त्यावरून वाद निर्माण झाला आहे. ही कार्यशाळा कमी खर्चात पुणे किंवा मुंबईत घेता आली असती. त्यासाठी लोणावळ्यात (Lonavala) लाखो रुपयांची उधलपट्टी कशासाठी? ही कार्यशाळा होती की इव्हेंट मॅनेटमेंट शो?, असा सवाल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा दिपाली सरदेशमुख (Deepali Sardeshmukh) यांनी केला आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांच्यासह विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, बालभारतीचे संचालक, राज्य शिक्षण मंडळासह शिक्षणाधिकारी, राज्यभरातील अनेक अधिकारी, महापालिका, जिल्हा परिषदांमधील अधिकाऱ्यांची या परिषदेला उपस्थिती होती.

हेही वाचा : बालभारतीने वाढवले पालकांचे बजेट; या पाठ्यपुस्तकांच्या किंमती २०० रुपयांच्या पार

कार्यशाळा दोन दिवस असल्याने सर्व अधिकाऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यावरूनच सरदेशमुख यांनी केसरकर यांच्यासह शिक्षण विभागावर टीका केली आहे. सरदेशमुख म्हणाल्या की, ही उधळपट्टी सुरू आहे. जनतेचा पैसा आहे म्हणून होऊ द्या कसाही आणि कितीही खर्च. परंतु, शिक्षणमंत्री, अधिकारी व कर्मचारी जनतेला उत्तर देण्यास बांधील आहात हे लक्षात असू द्या.

मुंबई, पुणे येथे राज्य शासनाची महत्त्वाची शासकीय कार्यालय आहेत. तेथील स्थानिक रहिवासी अधिकारी कर्मचारी असताना शिक्षण विभागाला Ambey velly मध्ये कार्यशाळा घेऊन असे काय वेगळे कार्य दोन दिवसात संपूर्ण साध्य होणार होते. हीच कार्यशाळा तुम्ही मुंबई अथवा पुण्यामध्ये अत्यल्प खर्चामध्ये घेऊ शकला असता. एकीकडे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आरटीई प्रतिपूर्ती पैसे देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत. राज्य शासन व शिक्षण विभाग जनतेला थाप मारतात आणि असा इव्हेंट मॅनेजमेंट शो करण्यासाठी कसे काय पैसा मिळतो? याचे उत्तर शिक्षणमंत्र्यांनी दिले पाहिजे, अशी अपेक्षा सरदेशमुख यांनी व्यक्त केली.

 तुम्हाला काम करण्यासाठी जनतेने निवडून दिले, वेगवेगळे इव्हेंट शो करण्यासाठी नाही. राज्यभर सुरू असलेल्या आरटीई घोटाळ्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कारवाईसाठी टाळाटाळ करत आहात, अशी टीकाही सरदेशमुख यांनी केली. कार्यशाळेसाठी किती खर्च झाला, तो पैसा कुठून आला, याचे उत्तर शिक्षण विभागाने द्यायला हवे, अशी मागणी सरदेशमुख यांनी ‘एज्युवार्ता’शी बोलताना केली.