अकरावी प्रवेशाला सुरूवात; प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरा या तारखेपासून

येत्या २५ मे पासून इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अकरावी प्रवेशाला सुरूवात; प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरा या तारखेपासून

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क    

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे (SSC Board) राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी (11th Admission) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे (Online Admission Process) वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून विद्यार्थ्यांना येत्या २५ मे पासून इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यार्थी येत्या २० ते २४ मे या कालावधीत प्रवेश अर्ज (Admission Application) भरण्याचा सराव करू शकतात, असे राज्य माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र,  पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात. २०२३-२४ या वर्षातील प्रवेश सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच केले जाणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक राज्याचे नवनियुक्त माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केले आहे.   

हेही वाचा : बारावी परीक्षेला ५८ दिवस उलटले, अजून निकाल का नाही? हे आहे निकालाच्या तारखेचे गणित     

शिक्षण विभागातर्फे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरून घेतला जातो. त्यानुसार येत्या 25 मे पासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे. तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांना २० मे ते इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत नोंदणी करता येणार आहे. इयत्ता अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर उपलब्ध करून दिला जाईल.

प्रवेशाची पहिली फेरी निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबविली जाईल. दुसरी व तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस आणि विशेष प्रवेश फेरी १ सात ते आठ दिवस राबविण्यात येईल, असे राज्य मंडळातर्फे नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https://11thadmission.org.in

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2