जगातील सर्वात मोठी 'रेडिओ दुर्बिण' पाहाण्यासाठी संधी; विज्ञानदिना निमित्त सर्वसामान्यांसाठी असणार खुली..

सर्वासामान्यांना जगातील सर्वात मोठी दुर्बिण पाहाण्याची संधी मिळणार आहे. 

जगातील सर्वात मोठी 'रेडिओ दुर्बिण' पाहाण्यासाठी संधी; विज्ञानदिना निमित्त सर्वसामान्यांसाठी असणार खुली..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क                                             

खोडद येथिल टाटा मुलभूत संशोधन संस्थेअंतर्गत (Tata Research Center) येणारे जगातील सर्वात मोठे रेडीओ दुर्बिण केंद्र (The largest radio telescope center in the world) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त (National Science Day) खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगातील सर्वात मोठी दुर्बिण पाहाण्याची संधी मिळणार आहे.  याबाबतची माहिती विज्ञान प्रदर्शन समिती खोडद (Science Exhibition Committee Khodak) यांच्याकडून देण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील नामवंत संस्था, शाळा व अभियांत्रिकी विद्यालये सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील जवळपास १५० प्रकल्प प्रदर्शनासाठी असणार आहेत. या “जीएमआरटी खोडद” (GMRT) प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन विज्ञान प्रदर्शन समितीकडून करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या पुणे जिलह्यातील खोडाद येथील टाटा मुलभूत संशोधन संस्था, खोडद - नारायणगाव येथे जगातील सर्वात मोठी रेडीओ दुर्बिण आहे. मागील २० वर्षापासून या संस्थेमार्फत विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते.या प्रदर्शनात अनेक नामवंत संस्था, शाळा व अभियांत्रिकी विद्यालये सहभागी होत असतात. या वर्षी देखील दिनांक २८ व २९ फेब्रुवारीला दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी हे दुर्बीण केंद्र व इतर विद्यालय व महाविद्यालयातील वैज्ञानिक प्रकल्प सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.

या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या  २८ फेब्रुवारी रोजी  सकाळी ९.३० वाजता कृषीरत्न अनिल मेहेर यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचा समारोप येत्या २९ फेब्रुवारीला वरिष्ठ भूवैज्ञानिक अफरोज चिश्ती यांच्या उपस्थित  होणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने जी.एम.आर.टी. – जगातील सर्वात मोठी रेडीओ दुर्बीण व तिच्या विविध प्रणाली बद्दलची माहिती. रेडीओ अॅस्ट्रॉनॉमीच्या इतिहासाची माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये खगोल शास्त्रज्ञांशी थेट संपर्क साधून प्रश्न विचारता येणार आहेत.