D.El.Ed. Admission : जागा रिक्त राहिल्याने विशेष फेरी, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळणार

विद्यार्थ्यांना दि. ३ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येतील. ही फेरी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीने होणार आहे.

D.El.Ed. Admission : जागा रिक्त राहिल्याने विशेष फेरी, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळणार
D.El.Ed. Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) डी.एल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया (D.El.Ed. Admission) ऑनलाईन पध्दतीने राबविली जात आहेत. आतापर्यंत या प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र शासकीय कोट्यातील (Government Quota) जागा रिक्त राहिल्याने प्रवेशासाठी विशेष फेरी (Special Round) घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना दि. ३ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येतील. ही फेरी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीने होणार आहे.

संबंधीत जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज व कागदपत्रांची पडताळणी दि.३ ते ९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होईल. या विशेष फेरीमधून बारावी उत्तीर्ण झालेले व नव्याने प्रवेश अर्ज भरण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी, नियमित डी.एल.एड. प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज पूर्ण न भरलेले, submit/approve न केलेले विद्यार्थी, दुरुस्ती (Correction) न केलेले विद्यार्थी आणि ऑनलाईन प्रवेश फेरीतून प्रवेश न घेतलेले विद्यार्थी भाग घेऊ शकतील.

Medical Admission : दहा हजार जागांसाठी ४७ हजार विद्यार्थी गुणवत्ता यादीत, पाहा प्रवेशाची स्थिती

ज्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश प्रक्रियेमध्ये अध्यापक विद्यालय मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे प्राधान्यक्रम बदलून द्यावेत. ज्या अध्यापक विद्यालयात जागा रिक्त आहे त्या अध्यापक विद्यालयाचा पसंतीक्रम द्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी डी.एल.एड. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी ऑनलाईन शुल्क भरले आहे. त्यांनी विशेष प्रवेश फेरीसाठी नव्याने शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यासाठी जो ईमेल आयडी व मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे तोच ईमेल आयडी व मोबाईल नंबर वापरणे गरजेचे आहे, अशी माहिती परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी दिली.

ऑनलाईन अर्ज भरताना ही घ्या काळजी

  • ऑनलाईन अर्ज भरून ऑनलाईन पडताळणी करून घ्यावी.
  • अर्ज approve झाल्यानंतर विद्यार्थ्यांने स्वतःचे Login उघडावे.
  • Login केल्यानंतर 7th step open करावी व तेथील "click to find seat & take admission" यावर click करावे.
  • ज्या अध्यापक विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे त्याचा विभाग, जिल्हा अध्यापक विद्यालय प्रकार इ. निवडावा.
  • ज्या अध्यापक विद्यालयात जागा रिक्त आहेत ते अध्यापक विद्यालय विद्यार्थ्यांने निवडावे व तेथील "Take admission" या बटणवर click करावे.
  • पुन्हा एकदा आपल्याला हवे असलेलेच अध्यापक विद्यालय निवडल्याची खात्री करावी व नंतरच " Confirm seat" या बटणवर click करावे. एकदा click केल्यानंतर यामध्ये पुन्हा कोणताही बदल करता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • अध्यापक विद्यालय निवडल्यानंतर विद्यार्थ्यांने "Print admission letter" वर click करून स्वतःच्या प्रवेशपत्राची Print काढून घ्यावी.
  • प्रवेशपत्र घेऊन विद्यार्थ्यांने ४ दिवसांचे आत अध्यापक विद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा.
  • अध्यापक विद्यालय प्राचार्यांनी पुनश्च प्रमाणपत्रांची पडताळणी करून पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यास online पध्दतीने अध्यापक विद्यालय Login मधून प्रवेश द्यावा.

प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळ - www.maa.ac.in

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD