कॅनडातील  ७०० भारतीय  विद्यार्थी हद्दपार, पण कठोर कारवाईपासून दिलासा

बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करून वर्क परमिशन मिळवले होते. एजंट ब्रिजेश मिश्रा याने या विद्यार्थ्यांसाठी बनावट पत्रे तयार केली आणि ते कॅनडात पोहोचल्यानंतर इतर महाविद्यालयांमध्ये त्यांचे प्रवेश निश्चित करून दिले होते.

कॅनडातील  ७०० भारतीय  विद्यार्थी हद्दपार, पण कठोर कारवाईपासून दिलासा
Indian students in Canada

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बनावट कागदपत्रे सादर करून ‘ऑफर लेटर’च्या आधारे ‘स्टडी व्हिसा’वर (Study Visa) महाविद्यालयांमध्ये प्रवेश (College Admission) मिळवणाऱ्या ७०० भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Students) कॅनडातून (Canada) हद्दपार करण्यात आले आहे. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी ७०० भारतीय विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे (Fake Documents) सादर करून उत्तर अमेरिकन (North America) शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतले होते. मात्र, या विद्यार्थ्यांवर कसलीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करून वर्क परमिशन मिळवले होते. एजंट ब्रिजेश मिश्रा याने या विद्यार्थ्यांसाठी बनावट पत्रे तयार केली आणि ते कॅनडात पोहोचल्यानंतर इतर महाविद्यालयांमध्ये त्यांचे प्रवेश निश्चित करून दिले होते. या विद्यार्थ्यांनी नंतर त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तिथेच नोकऱ्यादेखील मिळवल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी कॅनडाचे स्थायी नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला, अशी माहिती फ्रेजर यांनी दिली आहे. 

नक्षलवाद्यांसोबत राहून बंदुकीशी खेळणाऱ्या राजुलाचा बारावीच्या परीक्षेत यशस्वी लक्ष्यभेद

फ्रेजर म्हणाले, "त्या विद्यार्थ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे, परंतु त्यांच्या कृत्यांसाठी दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. विद्यार्थ्यांना आपल्याकडील पुरावे सादर करण्याची संधी दिली जाईल. या प्रकरणाचा तपास सुरू असून गुन्हेगारांना पकडणे हा आमचा उद्देश आहे. दरम्यान, तपासात असे आढळून आले की जालंधरस्थित परदेशातील अभ्यास एजन्सी चार वर्षांपासून फसवे व्हिसा अर्ज दाखल करत आहे. कॅनेडियन बॉर्डर सिक्युरिटी एजन्सीने (CBSA) विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशपत्रे फसवी असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले."

ऑस्ट्रेलियन विद्यापीठांची भारतातील सहा राज्यातील विद्यार्थ्यांवर बंदी; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी निर्णय

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ऑस्ट्रेलियाचा (Australia) तीन दिवसीय दौरा नुकताच पार पडला. पण या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान ऑस्ट्रेलियात पोहचण्याच्या एक दिवस आधीच तेथील विद्यापीठांनी (Australian Universities) भारतातील सहा राज्यांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर (Admission) बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये गुजरातसह (Gujarat) पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), उत्तराखंड (Uttarakhand), उत्तर प्रदेश (uttar Pradesh) आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मारचाही (Jammu Kashmir) समावेश आहे. मागील काही महिन्यांत या राज्यांमधील विद्यार्थ्यांच्या व्हिसा फसवणुकीची प्रकरणे वाढू लागल्याने विद्यापीठांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2