11th Admission : केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील शेवटची फेरी गुरूवारपासून

पुणे व पिंपरी चिंचवडसह मुंबई, अमरावती, नाशिक व नागपूर या महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे.

11th Admission : केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील शेवटची फेरी गुरूवारपासून
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क़

शिक्षण विभागाकडून (Education Department) इयत्ता अकरावी प्रवेशासाठी (11th Admission) ऑनलाईन पध्दतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) राबविली जात आहे. याअंर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्यांसह तीन विशेष फेऱ्या पूर्ण झाल्या असून आता दि. १७ ऑगस्टपासून चौशी विशेष फेरी सुरू होणार आहे. ही या प्रवेश प्रक्रियेतील शेवटची कॅप फेरी असेल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गुणवत्तेनुसार पसंतीच्या महाविद्यालयात (College) प्रवेश घेण्याची ही विद्यार्थ्यांना शेवटची संधी असणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवडसह मुंबई, अमरावती, नाशिक व नागपूर या महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये ९१७ महाविद्यालयांमध्ये एकूण १ लाख १६ हजार ५१० जागांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंतच्या एकूण सहा फेऱ्यांमध्ये ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर विविध कोट्यातून ८ हजारांहून अधिक प्रवेश झाले आहेत.

तलाठी भरतीसाठी अर्जांचा पाऊस; तब्बल १० लाख ४१ हजार अर्ज, पुणे जिल्हा आघाडीवर

एकूण ७३ हजार ८६० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असून अजूनही जवळपास ४३ हजार जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी आता १७ ऑगस्टपासून चौथी विशेष फेरी राबविली जाईल. ही फेरी कॅप प्रक्रियेतील शेवटची फेरी असेल. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना २३ ऑगस्टपर्यंत नवीन नोंदणीसह अर्ज भरता यणार आहे. तर २६ ऑगस्ट रोजी निवड यादी प्रसिध्द होऊन ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागेल.

चौथी विशेष व शेवटच्या कॅप फेरीचे वेळापत्रक

दि. १७ ते २३ ऑगस्ट – कॅप, अल्पसंख्यांक व इनहाऊस कोटासाठी नवीन नोंदणी, अर्ज भरणे व दुरुस्ती करणे, मार्गदर्शन केंद्रांवर कागदपत्रांची पडतालणी, पसंती क्रम भरणे व दुरुस्ती करणे.

दि. २४ ते २५ ऑगस्ट – कॅप निवडीसाठी डाटा प्रोसेसिंग

दि. २६ ऑगस्ट (स. १०) – निवड यादी प्रसिध्द

दि. २६ ते ३१ ऑगस्ट – प्रवेश निश्चित करणे

पुणे व पिंपरी चिंचवडमधील अकरावी प्रवेशाची स्थिती

एकूण महाविद्यालये - ९१७

प्रवेश क्षमता – १,१६,५१०

फेऱ्या         प्रवेश

पहिली        २२,६३५

दुसरी         ८,९७२

तिसरी        ५१६४

पहिली विशेष   २१,००८

दुसरी विशेष    ५,३३२

तिसरी विशेष   २,४३४

कोटा प्रवेश     ८,३१५

एकूण प्रवेश     ७३,८६०

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo