शालेय शिक्षणात स्काऊट गाईड विषय सक्तीचा : दीपक केसरकर यांची घोषणा 

विद्यार्थ्यांनी शाळेकडून दिला जाणारा गणवेश सोमवार, मंगळवार आणि बुधवारी तर शासनाकडून देण्यात येणारा गणवेश  गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी वापरता येणार आहे.

शालेय शिक्षणात स्काऊट गाईड विषय सक्तीचा : दीपक केसरकर यांची घोषणा 
Deepak Kesarkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 राज्यातील शाळांमध्ये स्काऊट गाईड हा विषय बंधनकारक (scout guide subject compulsory to school education) केला जाणार असल्याची घोषणा राज्याचे शाळेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (minister of education deepak kesarkar ) यांनी शुक्रवारी केली.तसेच विद्यार्थ्यांनी शाळेकडून दिला जाणारा गणवेश सोमवार, मंगळवार आणि बुधवारी तर शासनाकडून देण्यात येणारा गणवेश  (Uniforms )  गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी वापरता येणार आहे. शासनाकडून देण्यात येणारा गणवेश हा आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट आशा स्वरूपाचा असून तो स्काऊट गाईडसाठी वापरता येणार आहे,असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या वर्षांपासून विद्यार्थ्यांना दोन गणवेश वापरण्यास मिळणार आहेत. 
          राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली. 
       केसरकर म्हणाले,  विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, त्यांना श्रमाचे महत्व कळावे आणि सामाजिक बांधीलकीची भावना जागृत व्हावी, यासाठी शाळेत स्काऊट गाईड विषय सक्तीचा केला आहे.विद्यार्थ्यांना गणवेशाबरोबर बूट व  सॉक्स सुध्दा दिले जाणार आहेत.स्काऊट गाईड विषयामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक गणवेश घ्यावा लागला असता .काही विद्यार्थ्यांना तो विकत घेणे शक्य झाले नसते.त्यामूळे शासनाकडून दिला जाणारा गणवेश स्काऊट गाईडसाठी वापरता येईल.या वर्षी स्थानिक समित्यांनी हा गणवेश उपलब्ध करून द्यायचा आहे.2024 पासून विद्यार्थ्यांना गणवेशाचे कापड उपलब्ध करून दिले जाईल.