JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या संघटनांचा डंका 

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पुढे दिसणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) उमेदवारांचा डाव्या संघटनांच्या उमेदवारांनी पराभव केला आहे.

JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या संघटनांचा डंका 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशभरातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठांच्या केंद्र स्थानी असणाऱ्या आणि नेहमी चर्चेत असणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू JNU) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचे निकाल (Student Union Election Results)हाती आले आहेत. जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी पक्षांच्या युतीने (Coalition of Left Student Parties)चारही केंद्रीय पॅनेलच्या जागा जिंकल्या आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहसचिव ही पदे (The posts of President, Vice President, General Secretary and Joint Secretary)डाव्या संघटनांनी जिंकली आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पुढे दिसणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी-ABVP) उमेदवारांचा त्यांनी पराभव केला आहे.

JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत जवळपास 73% मतदान झाले, एकूण 19 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. अध्यक्षपदासाठी आठ उमेदवार रिंगणात होते. 
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) चे धनंजय यांनी 2,598 मते मिळवून JNUSU अध्यक्षपदावर कब्जा केला. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) उमेश सी अजमीरा यांना 1,676 मते मिळाली आहेत.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या अविजित घोष यांनी ABVP च्या दीपिका शर्मा यांचा पराभव करून उपाध्यक्षपद पटकावले. डाव्या बाजूच्या BAPSA उमेदवार प्रियांशी आर्य यांनी ABVP च्या अर्जुन आनंद यांचा पराभव करून सरचिटणीसपदासाठी विजय निश्चित केला. डाव्या संघटनांच्या उमेदवार स्वाती सिंह यांचा अर्ज निवडणूक समितीने रद्द केला आहे. यानंतर डाव्या संघटनांनी प्रियांशी आर्य यांना पाठिंबा जाहीर केला होता. सहसचिव पदाबाबत बोलायचे झाले तर डाव्या संघटनांचे उमेदवार मोहम्मद साजिद यांनी अभाविपच्या गोविंद यांचा पराभव करून हे पद जिंकले.