अन्यथा त्या शाळांचे  वेतन अनुदान बंद ..       

नव्याने २०  टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांमधील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या वेतनासाठी विद्यार्थी आधार अपडेटची अट घातली आहे.

अन्यथा त्या शाळांचे  वेतन अनुदान बंद ..       

  संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार अपडेट aadhaar update करणे आवश्यक आहे. आधार अपडेट न केल्यास नव्याने टप्पा अनुदानावर येणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना वेतन आनुदानाला salary subsidy मुकावे लागणार असल्याचे शिक्षण विभागाने Department of Education स्पष्ट केले आहे. परंतु, आधार अपडेट करताना तांत्रिक अडचणींचा technical difficulties सामना करावा लागत असल्याने आधारसाठी वेतन थांबवू नये, अशी मागणी शिक्षक teacher व मुख्याध्यापकांकडून करण्यात आली आहे.                                

 राज्य शासनातर्फे २० , ४० , ६०  टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. नव्याने २०  टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांमधील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या वेतनासाठी विद्यार्थी आधार अपडेटची अट घातली आहे. येत्या ३०  एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाले नाही तर वेतन अनुदान थांबवले जाईल अशी शिक्षण विभागाने भूमिका घेतली. मात्र त्यावर शिक्षक आमदारांनी व शिक्षक, मुख्याध्यापक संघटनेच्या प्रतिनिधींना शिक्षण आयुक्त व प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालकांबरोबर याबाबत चर्चा केली. त्यात आधार अपडेट करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने ३०  एप्रिलपर्यंत काम पूर्ण न झाल्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर शिक्षण विभागाने सकारात्मक भूमिका दाखवली.      

--------------------------------                               

    " अनेक वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना टप्पा अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहे, अशा परिस्थितीत आधार अपडेट झाले नाही म्हणून त्यांचे वेतन थांबवणे चुकीचे आहे. तसेच संबंधित शिक्षकांना अतिरिक्त ठरवणे योग्य नाही. ३०  एप्रिलपर्यंत आधार अपडेट झाले नाही तर मुदतवाढ देण्याचे शिक्षण विभागाने मान्य केले आहे."   

- नारायण शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे                              

" केवळ २०  टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शिक्षकांच्या वेतन अनुदानाबाबतचा मुद्दा उपस्थित झाला आहे. सोमवारी याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बरोबर चर्चा करण्यात आली त्यात ३०  एप्रिल पर्यंत विद्यार्थी आधार अपडेट झाले नाही तर मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली त्यास शिक्षण विभागाने सकारात्मकता दर्शवली." 

- जे.के पाटील, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना