विद्यापीठाचा १२४ वा पदवी प्रदान समारंभ ३ जुलैला 

कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष  प्रा. टी. जी. सीताराम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाचा १२४ वा पदवी प्रदान समारंभ ३ जुलैला 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (Savitribai Phule Pune University)१२४ वा पदवी प्रदान समारंभ (Graduation Ceremony)येत्या ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil)व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष  प्रा. टी. जी. सीताराम (AICTE President Prof. T. G. Sitaram)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi), प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे आणि परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्यासह विद्यार्थी व विविध मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाच्या १२४ व्या पदवी प्रदान समारंभात ऑक्टो / नोव्हें., २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील ७,१२५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहेत. विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या समारंभात ४ हजार ८१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, २ हजार २० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, ३५ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, २३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी., १४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर ३ विद्यार्थ्यांना एम.फिलचे प्रमाणपत्र मिळणार आहे. या कार्यक्रमात विविध विद्याशाखांमधील गुणवंत ७१ विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते  ११७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत,असे विद्यापीठातर्फे कळवण्यात आले आहे.