आरटीईची लॉटरी निघणार; पण प्रत्यक्ष प्रवेशाला वेळ का लागणार ..

प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे ऑनलाईन लॉटरी काढली जात आहे.

 आरटीईची लॉटरी निघणार; पण प्रत्यक्ष प्रवेशाला वेळ का लागणार ..

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE act दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील आरटीई प्रवेशासाठी RTE admistion बुधवारी लॉटरी lottery काढली जाणार आहे.परंतु लॉटरी काढल्यानंतर तात्काळ विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस (admission sms) मिळणार नाहीत तर त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.बुधवारी केवळ प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा राबवला जाणार आहे.                                    

शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेशासाठी राज्यात उपलब्ध असलेल्या एक लाख १ हजार ९६९ जागांसाठी तीन लाख ६४ हजार ३९० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे ऑनलाईन लॉटरी काढली जात आहे. बुधवारी सकाळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता लॉटरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यावेळी उपस्थित अधिकारी व इतर व्यक्तींकडून काही क्रमांक निवडले जाणार आहेत. हे क्रमांक संगणक प्रणालीमध्ये टाकून ऑनलाइन लॉटरीद्वारे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. लॉटरीद्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस पाठविले जाणार आहेत. तसेच संकेतस्थळावर एप्लीकेशन क्रमांक टाकून प्रवेश मिळाला किंवा नाही याबाबतची माहिती जाणून घेता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा कालावधी लागू शकतो. परिणामी पालकांना प्रवेशासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
           प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक देविदास कुलाळ म्हणाले, आरटीई प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी काढण्याची प्राथमिक प्रक्रिया बुधवारी सकाळी ११ वाजता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयात पूर्ण केली जाईल. त्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस पाठवले जातील.