‘आयुष’ची प्रवेशप्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत चालणार; तीन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

सीईटी सेलकडून एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही राबविली जात असून सध्या दुसरी फेरी सुरू आहे. त्यानंतर आयुष अभ्यासक्रमांची प्रक्रिया सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

‘आयुष’ची प्रवेशप्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत चालणार; तीन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर
Medical Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षाकडून (CET Cell) बीएएमएस (BAMS), बीएचएमएस (BHMS), बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, आणि बीपी अन्ड ओ या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ९ सप्टेंबरपासून पसंतीक्रम अर्ज भरता येणार आहेत. सेलने जाहीर केलेल्या तीन फेऱ्यांच्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Medical Admissions 2023)

सीईटी सेलकडून एमबीबीएस (MBBS) व बीडीएस (BDS) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही राबविली जात असून सध्या दुसरी फेरी सुरू आहे. त्यानंतर आयुष अभ्यासक्रमांची प्रक्रिया सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सेलकडून आयुष व इतर संबंधित अभ्यासक्रमांसाठीचे तीन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठ हे पैसे कमावण्याचे माध्यम आहे काय? ; आधी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडावा - शशिकांत तिकोटे

सेलकडून या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यापुर्वीच नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता. पहिल्या फेरीसाठी ८ सप्टेंबर रोजी अभ्यासक्रमनिहाय उपलब्ध जागांची माहिती प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत पसंतीक्रम भरता येतील. तर त्यानुसार १४ सप्टेंबर रोजी पहिल्या फेरीची निवड यादी प्रसिध्द केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १५ ते २० सप्टेंबर दरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागेल. विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबर रोजी प्रवेश रद्द करता येतील.

दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक –

रिक्त जागांची माहिती प्रसिध्द करणे – ३० सप्टेंबर

पसंतीक्रम नोंदविणे – १ ते ३ ऑक्टोबर

निवड यादी प्रसिध्द करणे – ५ ऑक्टोबर

प्रत्यक्ष प्रवेश घेणे – ६ ते १० ऑक्टोबर

प्रवेश रद्द करणे – १९ ऑक्टोबर

तिसरी फेरी वेळापत्रक

ऑनलाईन नोंदणी (पहिल्या व दुसऱ्या फेरीत प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नोंदणी करावी) – २० व २१ ऑक्टोबर

नोंदणी शुल्क भरणे – २० ते २२ ऑक्टोबर

रिक्त जागांची माहिती प्रसिध्द करणे – २१ ऑक्टोबर

 नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द करणे – २३ ऑक्टोबर

राज्य गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे – २३ ऑक्टोबर

पसंतीक्रम नोंदविणे – २३ व २४ ऑक्टोबर

निवड यादी प्रसिध्द करणे – २६ ऑक्टोबर

प्रत्यक्ष प्रवेश घेणे – २७ ते ३० ऑक्टोबर

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo