NEET पेपर लीक प्रकरणात एका पत्रकाराला अटक 

एजन्सीने झारखंडच्या हजारीबाग येथून शनिवारी एका पत्रकाराला अटक केली. जमालुद्दीन असे या पत्रकाराचे नाव असून तो एका हिंदी वृत्तपत्रासाठी काम करतो.

NEET पेपर लीक प्रकरणात एका पत्रकाराला अटक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET पेपर लीक प्रकरण तापले असून या प्रकरणी CBI ने मोठी कारवाई करत एका पत्रकाराला अटक केली आहे.तर गुजरातमध्ये सीबीआयच्या पथकांनी गोध्रा, खेडा, अहमदाबाद आणि आणंदमध्ये सात ठिकाणी छापे टाकले आहेत. 

एकीकडे NEET पेपर लीकवरून राजकीय युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे CBI ने गुन्हा दाखल करून वेगवान कारवाई सुरू केली आहे. एजन्सीने झारखंडच्या हजारीबाग येथून शनिवारी एका पत्रकाराला अटक केली. जमालुद्दीन असे या पत्रकाराचे नाव असून तो एका हिंदी वृत्तपत्रासाठी काम करतो. दरम्यान,  काल  ओएसिस शाळेचे मुख्याध्यापक एहसानुल हक आणि उपमुख्याध्यापक इम्तियाज आलम यांना शुक्रवारी कथित पेपर लीकमध्ये त्यांच्या संशयास्पद भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आलम यांची एनटीएचे पर्यवेक्षक आणि एसिस स्कूलचे केंद्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पेपर फुटीप्रकरणी सीबीआय जिल्ह्यातील आणखी पाच जणांची चौकशी करत आहे. NEET मधील कथित अनियमिततेच्या तपासात सीबीआयने 27 जून रोजी पहिली अटक केली होती.
या प्रकरणी सीबीआयने किंग पिन संजीव मुखियाच्या दोन गुंडांनाही अटक केली आहे. हजारीबागेतील ओएसिस शाळेतूनच पेपर फुटल्याचा संशय CBI ला आहे.