आरटीई प्रवेशाची लॉटरी बुधवारी

आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरल्यानंतर अनेक पालकांना प्रवेशाची लॉटरी केव्हा काढली याची प्रतीक्षा होती.

आरटीई प्रवेशाची लॉटरी बुधवारी

 राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जातात.  त्यासाठी येत्या ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत.                                      

   आरटीई प्रवेशासाठी तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे कोणाला प्रवेश मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाले आहे. आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरल्यानंतर अनेक पालकांना प्रवेशाची लॉटरी केव्हा काढली जाणार याची प्रतीक्षा होती. अखेर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयात ऑनलाईन लॉटरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या लॉटरीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून काही कालावधीनंतर लॉटरीच्या सोडतीची लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी कळविले आहे.