SPPU Admission : सर्व विभागांची मेरीट लिस्ट संकेस्थळावर प्रसिद्ध; ऑनलाईन प्रवेशाला सुरूवात

विभागनिहाय व आरक्षण निहाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे विभागातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

SPPU Admission : सर्व विभागांची मेरीट लिस्ट संकेस्थळावर प्रसिद्ध; ऑनलाईन प्रवेशाला सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)विविध विभांगांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल (Result of pre-admission examination)जाहीर झाल्यानंतर आता विभागनिहाय व आरक्षण निहाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर (Merit list of students announced)करण्यात आली आहे.त्यामुळे विभागातील प्रवेश प्रक्रिया (Admission Process in the Department) सुरू झाली असून प्रवेश मिळालेले विद्यार्थी 5 जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने कागदपत्र आपलोड करून आपला प्रवेश निश्चित करू शकतात.तसेच कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी केल्यानंतर पुढील तीन दिवसांत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने प्रवेश शुल्क भरता येणार आहेत, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

विद्यापीठाच्या विभागात प्रवेश मिळावा,अशी अनेक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा असते.त्यामुळे तब्बल 14 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विभागात प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी नोंदणी केली होती.परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत होते, अखेर विभागातर्फे गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.त्यामुळे प्रवेशास पात्र विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेऊ शकतात.विद्यार्थी https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx या लिंकवर जाऊन मेरिटलिस्ट पाहू शकतात. 

गेल्या काही वर्षात विद्यापीठातील वासतीगृहांची संख्या वाढत चालली आहे.त्यामुळे विद्यापीठातील सोई-सुविधा  यांच्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.तसेच गेल्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातील विभागांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम शिकवण्यास सुरूवात झाली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन विषय शिक्षणयाची संधी प्राप्त झाली आहे.विद्यापीठातर्फे लवकरच प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाणार आहे.