आदिवासी वसतिगृहातील मुला-मुलींवर उपोषण करण्याची वेळ

मांजरी भागात आदिवासी कल्याण विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह आहे. यामध्ये सुमारे ६०० मुले व २०० हून अधिक मुली आहेत. मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी २८ नोव्हेंबरपासून साखळी उपोषण सुरू केली आहे.

आदिवासी वसतिगृहातील मुला-मुलींवर उपोषण करण्याची वेळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील मांजरी परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील (Tribal Students Government Hostel) सुमारे ६५० विद्यार्थ्यांवर उपोषण करण्याची वेळ आहे. जेवणासाठीचे पैसे वेळेवर मिळावे, या रकमेत वाढ करावी, चांगल्या प्राथमिक सुविधा मिळव्यात, यांसह इतर विविध मागण्यांसाठी तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे उपोषणाचे पाऊल उचलावे लागल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. (Pune News)

 

मांजरी भागात आदिवासी कल्याण विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह आहे. यामध्ये सुमारे ६०० मुले व २०० हून अधिक मुली आहेत. मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी २८ नोव्हेंबरपासून साखळी उपोषण सुरू केली आहे. २०१९ पासून मागण्यांसाठी पाठपुरावा करत असून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात विविध कारणांमुळे गैरसोय होत असल्याची त्यांची तक्रार आहे.

स्वायत्त महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून कारवाई

 

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करावी किंवा जेवण पुर्ववत सुरू करावे, ही रक्कम वेळेत मिळावी, या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचप्रमाणे एमएससीआयटी, टायपिंग आदी कोर्सेस सुरू करावेत, सुरक्षारक्षक, सफाई कामगार पुरविण्यात यावेत, वेळेत प्रवेश द्यावेत, इमारत शासकीय जागेत असाव्यात, मोफत आरोग्य सुविधा मिळावी, आदी मागण्यांचाही समावेश आहे.

 

विद्यार्थ्यांनी गृहपालावर ठपका ठेवला आहे. वसतिगृहातील गृहपाल डीबीटी टाकण्यासाठी विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देतात व वेळेत टाकत नाही. त्यामुळे त्याचा वेळेवर लाभ मिळत नाही. त्यामुळे सर्व गृहपालांना समज देण्यात यावी, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे. बार्टी व सारथीच्या धर्तीवर देण्यात येणाऱ्या योजना सुरू कराव्यात, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण मिळावे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचीही त्यांची मागणी आहे. दरम्यान, आयुक्त किंवा अप्पर आयुक्तांकडून उपोषणाची दखल घेईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO