शासकीय व खासगी शाळांसाठी ६६ कोटींची पारितोषिके; ४५ दिवसांच्या उपक्रमांतून ठरणार स्पर्धेचा निकाल

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत शाळांची विभागणी करण्यात आली आहे.

शासकीय व खासगी शाळांसाठी ६६ कोटींची पारितोषिके; ४५ दिवसांच्या उपक्रमांतून ठरणार स्पर्धेचा निकाल
My School, Beautiful School

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ (My School, Beautiful School) हे अभियान राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना या अभियानात सहभागी होता येणार आहे. यातील विजेत्या शाळांना भरघोस पारितोषिके दिली जाणार असून एकूण पारितोषिकांची रक्कम ६६ कोटी रुपयांहून अधिक आहे. (Maharashtra Government)

 

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत शाळांची विभागणी करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महापालिका कार्यक्षेत्र, वर्ग अ व वर्ग ब च्या महापालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर ही स्पर्धा होईल.

आदिवासी वसतिगृहातील मुला-मुलींवर उपोषण करण्याची वेळ

 

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापव प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेबाबत प्रोत्साहित करणे, व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे, शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे आदी या अभियानाची उद्दिष्टे आहेत. हे अभियान ४५ दिवस चालणार असून या कालावधीत राबविण्यात येणारे विद्यार्थीकेंद्रीत उपक्रमांना ६० गुण आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित कार्यक्रमांना ४० गुण दिले जातील. शिक्षण आयुक्तांकडून हा कालावधीची घोषणा केली जाईल.

 

अशी असतील पारितोषिके

बृहन्मुंबई महापालिका कार्यक्षेत्र, वर्ग अ व वर्ग ब च्या महापालिकांचे कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाच्या शासकीय व खासगी शाळेला स्वतंत्रपणे २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रमे ११ व सात सात लाख रुपयांचे बक्षिस असेल. उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय व खासगी शाळांना तालुका, जिल्हा व विभागस्तर अशी बक्षिसे दिली जातील. तालुकास्तरावर पहिल्या क्रमांकासाठी तीन लाख तर दुसरा व तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रमे दोन व एक लाख रुपये बक्षिस असेल.

 

जिल्हास्तरावर पहिले पारितोषिक ११ लाखांचे तर दुसरे व तिसरे पारितोषिक अनुक्रमे पाच व तीन लाखांचे देण्यात येईल. विभागस्तरावर पहिले पारतोषिक २१ लाख रुपये असणार आहे. तर दुसरे व तिसऱ्या क्रमांकावरील शाळांना अनुक्रमे ११ व सात लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळेला ५१ लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रमे २१ लाख आणि ११ लाख रुपयांचे बक्षिस आहे. ही बक्षिसे शासकीय व खासगी शाळांसाठी स्वतंत्रपणे दिली जातील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO