अर्थशास्त्र विषयाशिवाय वाणिज्य शाखेचा पदवीधर ? 

विद्यापीठाकडे प्रस्तावित केलेला अभ्यासक्रम जसाच्या तसा स्वीकारल्यास अर्थशास्त्र विषयाचे शिक्षक कमी होण्याचा धोका आहे. तसेच प्रस्तावित अभ्यासक्रम शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग , फायनान्स व इन्शुरन्स या विषयांचा मुख्य म्हणजे मेजर विषयात म्हणून समावेश करावा.

अर्थशास्त्र विषयाशिवाय वाणिज्य शाखेचा पदवीधर ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एखादा विद्यार्थी अर्थशास्त्र (Economics) विषयांचे शिक्षण न घेता वाणिज्य शाखेचा पदवीधर (Bachelor of Commerce) होणे योग्य नाही.त्यामुळे वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतर्गत (Faculty of Commerce and Administration) व्यावसायिक अर्थशास्त्र आणि बँकिंग, फायनानस आणि इंशोरन्स (Business Economics and Banking, Finance and Insurance) हा विषय सक्तीचा मुख्य म्हणजे मेजर असावा,या मागणीचे निवेदन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी (Savitribai Phule Pune University Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांना अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांनी दिले.

महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुध्दा त्यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले आहेत.विद्यापीठाने वाणिज्य व व्यवस्थापणशास्त्र विद्याशाखेंतर्गत येणा-या व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग अभ्यास मंडळाच्या संभाव्य अभ्यासक्रमानुसार व्यावसायिक अर्थशास्त्र हा मुख्य (मेजर) विषय ठेवण्याएवजी दुय्यम- (मायनर) ठेवण्याचे प्रस्तावित केले आहे.मात्र, हा अभ्यासक्रम जसाच्या तसा लागू झाल्यास विद्यार्थी व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग यासारख्या मूलभूत अभ्यासापासून वंचित राहतील.परिणामी वाणिज्य विद्याशाखेतून तयार होणारा विद्यार्थी परिपक्व होणार नाही.

हेही वाचा : स्वायत्त महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून कारवाई

अर्थशास्त्र हा विषय वाणिज्य शाखेसाठी मेजर ठेवल्याने कोणत्याही विषयाच्या कार्यभारावर परिणाम होणार नाही.मात्र,विद्यापीठाकडे प्रस्तावित केलेला अभ्यासक्रम जसाच्या तसा स्वीकारल्यास अर्थशास्त्र विषयाचे शिक्षक कमी होण्याचा धोका आहे.तसेच प्रस्तावित अभ्यासक्रम शिक्षकांवर अन्याय करणारा आहे.त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग , फायनान्स व इन्शुरन्स या विषयांचा मुख्य म्हणजे मेजर विषयात म्हणून समावेश करावा, या मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्यासह प्रकुलगुरू डॉ.पराग काळकर, प्रभारी कुलसचिव व अधिष्ठाता डॉ.विजय खरे यांना अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांनी दिले. यावेळी डॉ. अजय दरेकर, डॉ. मेघना भोसले,डॉ. विलास आढाव डॉ.लहानू रेटवडे,डॉ. परमेश्वर गडकर,डॉ दत्ता घोडके, सूर्यकांत गायकवाड डॉ.मनोहर सानप आदी उपस्थित होते.
----------------------