Times Ranking 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पुन्हा घसरण, देशातील 91 संस्थांचा समावेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने THE च्या  जागतिक विद्यापीठ क्रमवारीत २०२३ साली ६०१-६५० रॅकिंग मध्ये जागा पटकावली होती.

Times Ranking 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पुन्हा घसरण, देशातील 91 संस्थांचा समावेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

टाइम्स हायर एज्युकेशन (THE) ने जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२४ जाहीर केली आहे. त्यामध्ये ९१ भारतीय शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बेंगळुरूने भारतीय विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) ४१ वा क्रमांक पटकावला आहे. जागतिक क्रमवारीत पुणे विद्यापीठाचा समावेश ८०१-१००० रँकिंग मध्ये करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जागतिक क्रमवारीत विद्यापीठाची घसरण झाली आहे. (Times Ranking 2024)

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने THE च्या  जागतिक विद्यापीठ क्रमवारीत २०२३ साली ६०१-६५० रॅकिंग मध्ये जागा पटकावली होती. 2024 च्या रँकिंमध्ये विद्यापीठ ८०१-१००० च्या रॅकींग मध्ये पोहोचले आहे. त्याआधी म्हणजे २०२२ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने  ८०१ ते १००० या गटात स्थान मिळवले होते. त्यामुळे काही महिन्यांत विद्यापीठाच्या पदरी निराशा पडली आहे. जून महिन्यात 2023 चे रँकिंग जाहीर करण्यात आले होते.

विद्यार्थिनींनी तयार केला गणेश विसर्जन मिरवणुकीचा नकाशा; एकदा ठिकाणं पाहूनच बाहेर पडा...

दरम्यान, जगातील विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्तेची माहिती सांगणारी 'टाइम्स हायर रँकिंग' नुकतीच जाहीर झाली आहे. ही रँकिंग जाहीर करताना, विद्यार्थी-प्राध्यापकांचे प्रमाण, अध्यापन पद्धती, संशोधन, इंडस्ट्री कनेक्ट, संशोधन प्रबंध, इंटरनॅशनल आउटकम अशा मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार करण्यात येतो. IISc बंगलोर नंतर अण्णा विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया, महात्मा गांधी विद्यापीठ आणि शुलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सायन्सेस यांचा क्रमांक लागतो. ही विद्यापीठे ५०१-६०० च्या दरम्यान आहेत.

 

टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे. तर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तर हार्वर्ड विद्यापीठ चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय केंब्रिज विद्यापीठ पाचव्या क्रमांकावर आहे.

 

  या भारतातील टॉप १० शैक्षणिक संस्था

 

१) IISc बंगलोर (२०१-२५० रँक)

२) अण्णा विद्यापीठ (रँक ५०१-६००)

३) जामिया मिलिया इस्लामिया (५०१-६०० रँक)

४) महात्मा गांधी विद्यापीठ (रँक ५०१-६००)

५) शूलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सायन्सेस (५०१-६०० रँक)

६) अलगप्पा विद्यापीठ (६०१-८०० रँक)

७) अलिगड मुस्लिम विद्यापीठ (६०१-८०० रँक)

८)  बनारस हिंदू विद्यापीठ (६०१-८०० रँक)

९) भारथियार विद्यापीठ (६०१-८०० रँक)

१०) भारतीय IIT गुवाहाटी (६०१-८०० रँक)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j