Vertical University : महाराष्ट्र सरकारकडून निकष जाहीर; जागा, इमारत, सोयीसुविधा, पात्रतेच्या अटी पाहा...

Vertical University Campus स्थापन करण्यासाठी किमान १५००० चौ.मी. बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत असावी.

Vertical University : महाराष्ट्र सरकारकडून निकष जाहीर; जागा, इमारत, सोयीसुविधा, पात्रतेच्या अटी पाहा...
Vertical University Campus

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात Vertical University स्थापन करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने (Maharashtra Government) महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे आदी महापालिका क्षेत्रांत जागेच्या कमतरतेमुळे Vertical University Campus साठी आवश्यक जागेचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार या विद्यापीठासाठी किमान १५००० चौ.मी. बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत उभारावी लागणार आहे. तसेच विद्यापीठासाठी इतर निकषही निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील Vertical University चा मार्ग मोकळा झाला आहे. (Vertical University in Maharashtra)

राज्याचे माजी मुख्य सचिव अरूण बोंगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली २०१५ मध्ये द्विसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने मुंबई शहर जिल्ह्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसेल तर न्युयॉर्क, वॉशिंग्टन व तेलअविव या शहरांमध्ये Vertical University Campus उभारण्यात आलेले आहेत, त्याच धर्तीवर मुंबई शहर जिल्ह्यामध्ये Vertical University Campus ला परवानगी देण्यात यावी, अशी शिफारस बोंगिरवार समितीने केली होती.

खबरदार : आपल्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची जात विचारू नका!

बोंगीरवार समितीने सुचविल्यानुसार Vertical University Campus बाबत सखोल अभ्यास करून राज्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांची स्थापना करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश करण्यासाठी २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये जयंत बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारे तसेच त्यानुषंगाने मागविण्यात आलेल्या सूचना व हरकती विचारात घेऊन Vertical University Campus स्थापन करण्याबाबत निकष निश्चित करण्यात आले आहे.

Vertical University Campus साठीचे निकष -

१. Vertical University Campus स्थापन करण्यासाठी किमान १५००० चौ.मी. बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत असावी.

२. उपलब्ध जमीन व बांधकाम यांचे प्रमाण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे तरतुदीनुसार तसेच संबंधित नियोजन प्राधिकरण क्षेत्रासाठी लागू असणाऱ्या प्रचलित मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार तसेच अन्य विकास नियमावलीस अनुसरुन असावे.

३. सदर इमारतीमध्ये कोणतेही व्यवसायिक भागधारक असू नयेत किंवा व्यावसायिक प्रयोजनासाठी इमारतीचा कोणताही भाग वापरता येणार नाही.

४. विद्यार्थी संख्या वाढल्यास वाढीव बांधकामासाठी वाव असावा. तथापि, जागेवरील एकूण कमाल अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र, इमारतीची उंची, सामासिक अंतरे इ., विनियमातील तरतुदींचे परिपालन होणे आवश्यक आहे. तसेच प्रचलित मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मधील तरतुदीनुसार एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र मर्यादेत Vertical University Campus चे नियोजन करण्यात यावे.

‘महाज्योती’ची परीक्षा वादात; खासगी क्लासचीच प्रश्नपत्रिका दिल्याचा आरोप, खुलासा मागवला

५. Vertical University Campus मध्ये विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वर्गखोल्या इतर सोई-सुविधा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) व अन्य संबंधित संस्थांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे असाव्यात. तसेच यासह संबंधित नियोजन प्राधिकरणास लागू असलेल्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदी देखील लागू राहतील.

६. Vertical University Campus स्थापन करण्यासाठी NAAC ची ३.२५ ग्रेड पॉईट किंवा समकक्ष NBA किंवा NIRF यामध्ये पहिल्या २०० मध्ये आलेले प्रायोजक मंडळ अर्ज करण्यास पात्र राहतील. Vertical University Campus स्थापन करण्यासाठी आवश्यक जमीन / इमारत प्रायोजक मंडळाच्या मालकीची किंवा ३० वर्षांच्या नोंदणीकृत भाडेतत्वावर असावी. विद्यापीठ स्थापन झाल्यापासून १५ वर्ष पूर्ण होण्याअगोदर विसर्जित झाल्यास विद्यापीठाची सर्व मत्ता, दायित्वाशिवाय आणि सर्व भारापासून मुक्त अशा स्वरूपात शासनाकडे निहीत होईल. यास्तव जागा भाडेतत्वावर असेल तर मूळ मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील,

८. विद्यापीठाच्या इमारतींमधील सुविधांसाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ तसेच संबंधित नियोजन प्राधिकरण क्षेत्रासाठी लागू असणाऱ्या प्रचलित मंजूर विकास नियंत्रण च प्रोत्साहन नियमावली मधील तरतुदी, इतर प्रणाली व या संदर्भात शासनाने वेळोवळी पारित केलेले अध्यादेश लागू राहतील.

खासगी शिकवणी समितीचा अहवाल पाच वर्षांपासून धूळखात; नियमावली लागू करण्याची मागणी

९. Vertical University Campus मध्ये किंवा जवळच्या परिसरात विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या वसतीगृहाची सोय असावी.

१०. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDCPR मधील विनियम क्र. ३.४.१ (vii) मधील तरतुदीनुसार तसेच बृहन्मुंबई नियोजन प्राधिकरणाच्या मंजूर बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली DCPR मधील विनियम क्र.३८ (२) (a) मधील तरतुदीनुसार शैक्षणिक प्रयोजनाच्या इमारतींच्या विकास प्रस्तावामध्ये जागेच्या किमान ४०% टक्के क्षेत्र क्रिडांगणासाठी राखीव ठेवावयाचे आहे. Vertical University Campus मध्ये संबंधित महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू असणाऱ्या प्रचलित मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार किमान ४०% क्षेत्र खेळाचे मैदानासाठी राखीव ठेवणे बंधनकारक राहील.

११. Vertical University Campus मध्ये इमारतीची कमाल उंची संबंधित नियोजन प्राधिकरण क्षेत्रासाठी लागू असणाऱ्या प्रचलित मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार मर्यादेत अनुज्ञेय राहील. तसेच बृहन्मुंबई क्षेत्रात संबंधित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली - २०३४ (DCPR - २०३४) व विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDCPR यामधील तरतुदी लागू राहतील.

१२. Vertical University Campus इमारतीचे बांधकामास संबंधित नियोजन प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

१३. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात इमारतीमध्ये पुरेसे उद्वाहन, रॅम्प्स, प्रशस्त जिने व अनुषंगिक सुविधा असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक संस्थाना (प्रायोजक मंडळ) स्वयं अर्थसहाय्यित Vertical University Campus स्थापन करण्यासाठी वरील तरतुदींपैकी जमीन, बांधकामाबाबतच्या निकषांव्यतिरिक्त दिनांक २९ मे २०१३ व दिनांक १९ जानेवारी २०१९ तसेच १७ मार्च २०२० रोजीच्या शासन निर्णयातील अन्य तरतुदी /मागदर्शक सूचना तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD