SSC Result Update : रात्रीचा दिवस केला अन् कष्टाच्या जोरावर मिळवली शाबासकीची थाप

पुणे शहरातील रात्र शाळांमध्ये असे अनेक विद्यार्थी दहावी-बारावीचे शिक्षण घेत शिक्षण पूर्ण करत आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातही रात्र शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे.

SSC Result Update : रात्रीचा दिवस केला अन् कष्टाच्या जोरावर मिळवली शाबासकीची थाप
Nights School SSC Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

SSC Result : अनेकांना प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून नोकरी किंवा व्यवसाय करणे भाग पडते. पण त्यांच्यातील शिक्षणाची जिद्द कमी होत नाही. संधी मिळाल्यानंतर चिकाटीने प्रयत्न करून यशाला गवसणी घालतात. पुणे शहरातील रात्र शाळांमध्ये असे अनेक विद्यार्थी दहावी-बारावीचे शिक्षण घेत शिक्षण पूर्ण करत आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातही रात्र शाळांमधील (Night Schools) विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे. (Maharashtra SSC Board Result)

आबासाहेब अत्रे रात्र शाळेतून १२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रियांका घोडके ही विद्यार्थिनी ७९ टक्के गुणांसह प्रथम आली आहे. शाळेचे प्राचार्य विजय सुर्यवंशी यांच्यासह इतर शिक्षख व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. सरस्वती मंदिर संस्थेचे, पूना नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत भरारी घेतली आहे.

मुले आठवी, नववीत आणि आई २० वर्षांनंतर दहावी पास !

पूना नाईट स्कुलचा निकाल शंभर टक्के लागला असून देवकन्या घरबुडवे यांनी ७७.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. शाला समितीचे अध्यक्ष अविनाश नाईक प्राचार्य सतीश वाघमारे, महेश पिसाळ, केदार शिंदे, अनिल राक्षे आणि रमाकांत सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. चिंतामणी रात्र शाळेचा निकाल ६८ टक्के इतका लागला आहे.

शाळेतील खुशालचंद पुणेकर या ४७ वर्षीय विद्यार्थ्याने ६२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर्षभर काबाड कष्ट करून स्वतःच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड न पडू देता स्वतःचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणि शिक्षणाची असलेली ओढ तसेच स्वतःवर असलेला आत्मविश्वास यांची सांगड घालून पुणेकर यांनी हे यश मिळवले आहे. शाळेचे प्राचार्य दिलीप लंके यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

पुण्याच्या स्वराली राजपुरकरला दहावीत १०० पैकी १०० टक्के गुण

आबासाहेब रात्र शाळेचा निकाल :

परीक्षा दिलेले विद्यार्थी – १२५

उत्तीर्ण – ९६

प्राविण्यासह प्रथम श्रेणी – १

प्रथम श्रेणी – १७

प्रथम क्रमांक – प्रियांका अशोक घोडके (७९ टक्के)

द्वितीय क्रमांक – अजिंक्य बापू गणगे (७१.४० टक्के)

तृतीय क्रमांक - नीता रामकृष्ण गावडे (७१.२० टक्के)

 

सरस्वती मंदिर संस्थेचे, पूना नाईट हायस्कूल

शाळेचा एकूण निकाल – १०० टक्के

प्रथम क्रमांक - देवकन्या प्रकाश घरबुडवे (७७.६० टक्के)

द्वितीय क्रमांक - शार्दूल संजय पवार (७१ टक्के)

तृतीय क्रमांक - यशवंत अंकुश पिलावरे (६७.२० टक्के)

 

चिंतामणी रात्र शाळा

शाळेचा एकूण निकाल - ६८ टक्के

प्रथम क्रमांक - खुशालचंद रखामाजी पुणेकर (६२ टक्के)

द्वितीय क्रमांक – कांचन इजगज (५९ टक्के)

श्वेता सुधाकर दत्ते (६८.७५ टक्के)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo