NEET PG चे कटऑफ आणले शुन्यावर; आरोग्य मंत्रालयाने दिली मोठी अपडेट

फेडरेशन ऑफ रेसिंडंट डॉक्टर्स असोसिएशनसह विविध वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांनी कटऑफ कमी करण्याची मागणी केलो होती.

NEET PG चे कटऑफ आणले शुन्यावर; आरोग्य मंत्रालयाने दिली मोठी अपडेट
NEET PG 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये (NEET PG 2023) प्रवेशासाठीचे कटऑफ ५० वरून थेट शुन्यावर आणण्यात आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) पर्सेंटाईल कमी करण्याबाबतची मागणी केलो होती. त्यावर मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) याबाबतची घोषणा केली आहे.

 

फेडरेशन ऑफ रेसिंडंट डॉक्टर्स असोसिएशनसह विविध वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांनी कटऑफ कमी करण्याची मागणी केलो होती. यावषी नीट पीजीचे खुल्या गटाचे कटऑफ ५० पर्सेंटाईल, पीडब्ल्युडीसाठी ४५ पर्सेंटाईल तर आरक्षित जागांसाठी ४० पर्सेंटाईल होते. यावर्षी कटऑफ जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसता. तसेच जागाही रिक्त राहतील, असा दावा संघटनांकडून करण्यात आला होता.  

विद्यार्थ्यांनो काळजी घ्या! कॅनडातील वाढत्या तणावामुळे भारताचे आवाहन

 

आरोग्य मंत्रालयाने ही मागणी मान्य करत कटऑफ थेट शुन्यावर आणले आहे. एमएमसीने याबाबतचे पत्रक काढत माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्रतेचे पर्सेंटाईल आरोग्य मंत्रालयाकडून शुन्य करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर समुपदेशनाच्या तिसऱ्या फेरीसाठी नव्याने नोंदणी व पसंतीक्रम भरता येणार आहेत.

 

नवीन नोंदणी व पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या निर्णयामुळे पात्र झालेले विद्यार्थी नोंदणी करू शकतील. आधी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांना पसंतीक्रमांमध्ये बदल करता येईल. तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे एमसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयावर टीका सुरू झाली आहे. युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी म्हटले आहे की, महाविद्यालयांच्या रिक्त जागांची काळजी करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. NEET प्रवेश परीक्षाचा मुळ हेतू दप्तरी दाखल केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमातील शैक्षणिक दर्जा तर खालावणारच परंतू भविष्यातील देशाची अरोग्य व्यवस्था कोलमडणार ही बाब सहन केली जाणार नाही. Neet -PG प्रवेशासाठी गुणांची पात्रता ५० वरून शून्य करण्यात येणार असेल तर या परीक्षेचे महत्व काय? त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा फी परत देण्याची जबाबदारी केंद्रातील प्रमुखांनी घेतली पाहिजे.प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j