पुण्याच्या स्वराली राजपुरकरला दहावीत १०० पैकी १०० टक्के गुण

स्वराली राजपुरकर हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत १००  टक्के गुण मिळवत चमकदार कामगिरी केली आहे.

पुण्याच्या स्वराली राजपुरकरला दहावीत  १०० पैकी १०० टक्के गुण
swarali rajpurkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (Deccan Education Society New English Medium School ) मधील स्वराली राजपुरकर (Swarali Rajpurkar) हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत १००  टक्के गुण (10th exam result hundred percent marks) मिळवत चमकदार कामगिरी केली आहे. स्वराली ही केवळ अभ्यासातच हुशार नाही तर गायन, नृत्य, ढोल- ताशा वादन या सर्वांत तरबेज आहे.

 हेही वाचा : शिक्षण मुले आठवी, नववीत आणि आई २० वर्षांनंतर दहावी पास !


    महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्यातील १५१  विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्यात पुणे विभागातील पाच विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असून डी.ई.एस.न्यू इंग्लिश मीडियम स्कूल शाळेतील स्वराली राजपुरकर हिने १०० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.

    स्वराली म्हणाली, आई बाबा आणि सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले मला यापुढील काळात इंजिनिअरिंग किंवा मेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. मी दररोज दोन किंवा तीन तास अभ्यास केला.सायंकाळी अभ्यास केला नाही. अभ्यासाचा ताण न घेता सायंकाळी डोके शांत ठेवले. मला ९५ ते ९८ च्या दरम्यान मार्क मिळतील अशी अपेक्षा होती. पण आज ऑनलाईन रिजल्ट पाहिला. त्यावेळी १०० टक्के मार्क मिळाल्याचे पाहून विश्वास बसत नव्हता.विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या सर्व गोष्टी त्यांनी कराव्यात आणि अभ्यासाकडेही लक्ष द्यावे.