‘एससी’ विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

‘एससी’ विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू
Students Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी (SC Students) निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. त्याचा लाभ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या (Scholarship Scheme) सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या असून त्या देखील राज्यात लागू करण्यात येतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्च विद्या विभूषित होणे, हा उद्देश ठेवून अनुसूचित जाती (नवबौद्धासह) विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना १९५९-६० पासून राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ

मार्च २०२१ पासून या योजनेंतर्गत २०२०-२१ ते २०२५-२६ या वर्षांसाठी दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यात येतील. निर्वाह भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून यासाठी ६ कोटी ५० लाख इतक्या वाढीव खर्चास देखील मान्यता देण्यात आली.  ही योजना केंद्र आणि राज्यामध्ये ६०:४० अशी राबविण्यात येते.

या निर्णयानुसार वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे ४ हजार रुपये ते १३ हजार ५०० रुपये तर वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे २ हजार ५०० ते ७ हजार रुपये असे सुधारित दर असतील.  शिष्यवृत्तीचा लाभ थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo