मुले आठवी, नववीत आणि आई २० वर्षांनंतर दहावी पास ! 

सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.त्यात 'देवकन्या प्रकाश घरबुडवे' यांनी ७७.६० गुण मिळवले आहेत.

मुले आठवी, नववीत आणि आई २० वर्षांनंतर दहावी पास ! 

राहुल शिंदे 

    वीस वर्षांपूर्वी शाळा सुटली... लग्नानंतर संसार, पती ,सासू-सासरे आणि मुलांचा सांभाळ करण्यात ' देवकन्या ' या स्वतःला विसरून गेल्या. पण यंदा त्यांनी दहावीची परीक्षा (10th exam ) दिली आणि दहावीत ७७.६० टक्के गुण  मिळवत पूना नाईट स्कूलमध्ये Pune night school प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत यश संपादन केले. आता त्यांना बारावी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. ( Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education 10 result)

हेही वाचा : शिक्षण SSC Result Update : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर; निकालात तीन टक्क्यांची घसरण, पाहा आणखी ठळक वैशिष्ट्ये...

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.त्यात 'देवकन्या प्रकाश घरबुडवे' यांनी ७७.६० गुण मिळवले आहेत.तर शार्दुल पवार या विद्यार्थ्याने ७१ टक्के तर यशवंत पिलावरे याने ६७.२० टक्के गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे.

      देवकन्या घरबुडवे म्हणाल्या, इयत्ता नववी उत्तीर्ण होऊन मी दहावीत गेले आणि त्यानंतर घरच्यांनी माझ्या लग्नाची तयारी केली. २००२ मध्ये दहावीत तीन-चार महिने गेल्यानंतर माझी शाळा सुटली आणि मी लग्न बंधनात अडकले. पुढे दोन मुले झाली एक मुलगा आता आठवीत आहे आणि  दुसरा नववीत आहे, या दोघांचाही अभ्यास मीच घेते. त्यांचा अभ्यास घेताना आपणही पुढील शिक्षण घ्यावे,असे मनापासून वाटत होते.

विशेष बातमी : शिक्षण SSC Result : दहावीच्या निकालात पुन्हा लातूर पॅटर्न; १०९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

    माझे पती पेंटिंगचा व्यवसाय करतात.  संसाराला मदत म्हणून मी सुद्धा भारती विद्यापीठातील एका कार्यालयात मावशी म्हणून कार्यालय स्वच्छतेचे काम करते. माझा शिक्षणातकडील ओढा पाहून येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यानंतर मी पुन्हा नाईट स्कूल येथे दहावीला प्रवेश घेतला. सकाळी काम आणि रात्री उशिरा अभ्यास असा दिनक्रम सुरू झाला. माझ्या पतीच्या पाठिंब्यामुळे मी चांगला अभ्यास करू शकतो आणि वीस वर्षानंतर परीक्षा देऊनही शाळेत पहिला क्रमांक मिळवू शकले,असेही देवकन्या घरबुडवे यांनी सांगितले. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीतर्फे गौरव करण्यात आला. यावेळी शाला समितीचे अध्यक्ष अविनाश नाईक, प्रशालेचे प्राचार्य सतीश वाघमारे , महेश पिसाळ , केदार शिंदे , अनिल राक्षे आदी उपस्थित होते.