शैलजा दराडे यांच्या भावालाही केले शिक्षण खात्यातून निलंबित

दादासाहेब रामचंद्र दराडे यांना पोलिसांनी अटक केली. हा अटकेचा कालावधी 48 तासांपेक्षा जास्त असल्याने त्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांच्या पदावरून तात्पुरते दूर करण्यात आले आहे.

शैलजा दराडे यांच्या भावालाही केले शिक्षण खात्यातून निलंबित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित केल्यानंतर आता त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांनाही शिक्षण खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.त्याचा भाऊ मुळशी तालुक्यातील हिवाळी वस्ती जिल्हा परिषदेच्या शाळेवर उपशिक्षक म्हणून कार्यरत होता.

तब्बल 44 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी शैलाजारात दराडे व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. शैलजा दराडे यांनी केलेल्या बेकायदेशीर व नियमबाह्य कामामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता त्यांच्या भावावर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

    दादासाहेब रामचंद्र दराडे यांना पोलिसांनी अटक केली. हा अटकेचा कालावधी 48 तासांपेक्षा जास्त असल्याने त्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांच्या पदावरून तात्पुरते दूर करण्यात आले आहे. तसेच त्यांना निलंबन काळात कोणतीही दुसरी खाजगी नोकरी अगर धंदा अथवा व्यवसाय करता येणार नाही, तसे निदर्शनास आल्यास त्यांचे कृत्य गैरशिस्तीचे समजले जाईल. तसेच पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांचे तात्पुरते मुख्यालय पंचायत समिती मुळशी शिक्षण विभाग हे असेल.शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशापैकी कोणत्याही एका अटीचा भंग केल्यास त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल.तसेच ते निर्वाह भत्ता मिळण्यास पात्र राहणार नाहीत, असा आदेश मुळशी गटविकास अधिकारी तसेच गटशिक्षण अधिकारी यांनी काढला आहे.