SSC Result : प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलचे उत्तुंग यश; ओम शिंदेने पटकावला प्रथम क्रमांक

प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलने यंदाही दहावीच्या निकालात आपला ठसा उमटवला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

SSC Result : प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलचे उत्तुंग यश; ओम शिंदेने पटकावला प्रथम क्रमांक
Priyadarshani Pune Police Public School SSC Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSC Board) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत (SSC Examination) प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलने (Priyadarshani Pune Police Public School) उत्तुंग यश मिळवले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून ओम शिंदे या विद्यार्थ्याने ९४.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. (Maharashtra SSC Board Result Update)

प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलने यंदाही दहावीच्या निकालात आपला ठसा उमटवला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यशाची परंपरा कायम ठेवली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेली परीक्षा शाळेतील ११९ विद्यार्थ्यांनी दिली होती. सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ५९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

SSC Result Update : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर; निकालात तीन टक्क्यांची घसरण, पाहा आणखी ठळक वैशिष्ट्ये...

शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक, ३२ विद्यार्थी ८० टक्क्यांच्यापुढे तर २९ विद्यार्थी ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी ३२ असून ५० ते ६० टक्क्यांच्यादरम्यान १७ विद्यार्थी आहेत. वेदिका तोडकर व प्रणाली शेंडे या विद्यार्थिनींनी संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला. तर बुशरा खान हिला ९१.८० टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळाला. त्यांच्यापाठोपाठ आर्यन पाध्ये (९१.६० टक्के), सिध्दी कडे (९१.६० टक्के), श्रावणी गायकवाड (९०.६० टक्के) आणि मयुर हाके (९० टक्के) यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

प्रियदर्शनी व्यवस्थापनाच्या संस्थापक सचिव तरूणी सिंग, विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंग व विश्वस्त नरेंद्र सिंग आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्पिता दीक्षित यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा या यशात सिंहाचा वाटा आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचेही मार्गदर्शन संस्थेला वेळोवेळी लाभले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासावर प्रियदर्शनी व्यवस्थापनाने लक्ष केंद्रित केले. शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश हीच गोष्ट अधोरेखित करते. प्रियदर्शनी सी.बी.एस.ई. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. गायत्री जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo