CBSE Board Exam : दहावी व बारावीच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठा बदल

पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेतील सर्वात मोठा बदल म्हणजे आता ५० टक्के प्रश्न सक्षमतेवर आधारित असतील.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाइटवर नवीन नमुने जारी केले आहेत. 

CBSE Board Exam : दहावी व बारावीच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठा बदल
CBSE exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE Board) २०२४ च्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्ये (Exam Pattern) अनेक मोठे बदल केले आहेत. हे स्पष्ट करण्यासाठी, नवीन नमुना पेपरचे संच जारी करण्यात आले आहेत. या नमुना प्रश्नपत्रिकेच्या (Sample Question Paper) मदतीने उमेदवारांना या वर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग स्कीम काय असेल हे स्पष्ट व्हायला विद्यार्थ्यांना मदत होईल. 

 

पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेतील सर्वात मोठा बदल म्हणजे आता ५० टक्के प्रश्न सक्षमतेवर आधारित असतील.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाइटवर नवीन नमुने जारी केले आहेत. नवीन परीक्षा पद्धतीत  आता अधिक विश्लेषणात्मक, संकल्पना आधारित प्रश्न असतील. प्रश्नांची विविधता MCQ (मल्टिपल चॉईस क्वेशन ), लहान उत्तरे आणि संक्षिप्त  उत्तरे अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका असेल.  सुमारे ४५ टक्के प्रश्नांचे MCQ मध्ये रूपांतर करण्यात आले असून त्यांना एक ते दोन गुण आहेत.  

 

शिक्षकांची होणार ऑनलाईन हजेरी! मंत्री केसरकरांनी दिले संकेत

नमुना पेपर असा करा डाउनलोड 

* नवीन नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी, cbseacademic.nic.in वर जा.

* प्रश्न बँक नावाचा विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.

* येथून अतिरिक्त सराव प्रश्नांवर जा आणि क्लिक करा.

* असे केल्याने एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर तुम्हाला अतिरिक्त सराव प्रश्न दिसतील.

* विषयानुसार ते येथून डाउनलोड करा आणि तपासा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j