मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या प्रमुखपदी IIT चा विद्यार्थी पवन दावूलुरी यांची निवड 

IIT मद्रासचे माजी विद्यार्थी पवन दावूलुरी यांची मायक्रोसॉफ्ट विंडोजचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या प्रमुखपदी IIT चा विद्यार्थी पवन दावूलुरी यांची निवड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांच्या नंतर आता अमेरिकेतील टेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या यादीत (In the list of heads of tech companies in America)आणखीन एक भारतीय नाव सामील झाले आहेत. IIT मद्रासचे माजी विद्यार्थी पवन दावूलुरी (Pawan Davuluri, an alumnus of IIT Madras)यांची मायक्रोसॉफ्ट विंडोजचे नवीन प्रमुख (The new head of Microsoft Windows)म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दावूलुरी यांनी पॅनोस पानय यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. 2023 मध्ये ऍमेझॉनमध्ये सामील होण्यासाठी पनयने मायक्रोसॉफ्ट विंडोजचे प्रमुख म्हणून आपले पद सोडले होते. पवन दावुलुरी हे केवळ मायक्रोसॉफ्ट विंडोजच्याच नव्हे तर सरफेसच्याही प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारतील.


मीडिया रिपोर्टनुसार, दावूलुरी यांनी आयआयटी मद्रासमधून पदवी प्राप्त केली आहे. दावूलुरी हे मायक्रोसॉफ्टशी 23 वर्षांहून अधिक काळापासून जोडलेले आहेत. त्यांनी आयआयटी मद्रास नंतर मेरीलँड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्यानंतर ते मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एका अंतर्गत मेलमध्ये पवन दावूलुरीबद्दल माहिती देताना, मायक्रोसॉफ्टच्या डिव्हाइस विभागाचे प्रमुख राजेश झा म्हणाले की,   पवन दावूलुरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, आम्ही नवीन एआय युगासाठी विंडोज क्लायंट आणि क्लाउड टूल्स तयार करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन घेण्यास सक्षम होऊ."