Ayush PG Admission : प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, चार फेऱ्यांतून दिले जाणार प्रवेश

प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक विद्यार्थ्यांना समितीच्या अधिकृत वेबसाइट aaccc.gov.in वर जाऊन संपूर्ण पाहता येईल.

Ayush PG Admission : प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, चार फेऱ्यांतून दिले जाणार प्रवेश
Ayush NEET PG Admission 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आयुष नीट पीजी २०२३ (Ayush NEET PG 2023) समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयुष प्रवेश केंद्रीय समुपदेशन समिती (AACCC) ने वेळापत्रक प्रसिध्द केले असून त्यानुसार पहिली फेरी २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत चार फेऱ्या असून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम व गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. (Ayush PG Admission)

 

प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक विद्यार्थ्यांना समितीच्या अधिकृत वेबसाइट aaccc.gov.in वर जाऊन संपूर्ण पाहता येईल. अधिकृत वेळापत्रकानुसार, पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया दि. २६ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २ ऑक्टोबर पर्यंत चालेल. दि. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या कालावधीत चॉईस फिलिंग घेण्यात येईल.

केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पात्रतेत केला बदल

जागा वाटप प्रक्रिया दि. ३ ते ४ ऑक्टोबर  या कालावधीत प्रसिद्ध केली जाईल आणि ५ ऑक्टोबर रोजी निवड यादी घोषित केला जाईल. उमेदवार दि. ६ ते १३ ऑक्टोबर पर्यंत वाटप केलेल्या संस्थेत तक्रार करू शकतात. आयुष नीट पीजी समुपदेशनाच्या चार फेऱ्या होतील. ज्यात सुरुवातीला ३ नियमित फेऱ्या आणि चौथी स्ट्रे व्हेकन्सी राउंडचा समावेश आहे. 

 

अशी करा नोंदणी 

*सर्व प्रथम AYUSH च्या अधिकृत वेबसाइट aaccc.gov.in वर जा.

*मुख्यपृष्ठावरील AYUSH NEET P नोंदणी लिंकवर क्लिक करा.

* स्वतःची नोंदणी करा आणि लॉग इन करा.

*अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.

*एकदा पूर्ण झाल्यावर, सबमिट करा क्लिक करा आणि पृष्ठ डाउनलोड करा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j