होय, आम्ही MPSC कर! सुशील काटकरांचा वडापावची गाडी ते हॉटेलपर्यंतचा प्रवास व्हाया MPSC...              

सातत्याने प्रयत्न करूनही अनेकांना ‘एमपीएससी’मध्ये अपयश येते. काहीजण खचून जातात, तर काही जण नव्या उमेदीने मार्ग बदलून यशही मिळवतात. सुशील काटकर हे त्यापैकीच एक.

होय, आम्ही MPSC कर! सुशील काटकरांचा वडापावची गाडी ते हॉटेलपर्यंतचा प्रवास व्हाया MPSC...              
Sushil Katkar

दीपा पिल्ले पुष्पकांथन

"माझ्या आजोबांनी कर्जामुळे आत्महत्या केली होती. त्यामुळे कर्जाचा बोजा वडिलांवर आलेला. १० वी (SSC) पूर्ण होईपर्यंत तालुका कधीच पाहिला नव्हता. शाळेत शिकत असताना स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) सोडाच उच्च शिक्षण (Higher Education) नावाचा प्रकार असतो हे ही माहीत नव्हते. वडिलांनी बाजरीची पोती विकून माझी MPSC ची फी भरली. तब्बल ९ वर्ष प्रयत्न करूनही हाती यश आले नाही. म्हणून मार्ग बदलला आणि हॉटेल व्यवसाय सुरु केला, आज पुण्यात (Pune) दोन हॉटेल चालवतो, गावी स्वत:चे घर बांधले, सगळी कर्ज फेडली..." पुण्यातील काटकर हॉटेलचे मालक सुशील काटकर (Sushil Katkar) सांगत होते. (MPSC Examination)

सातत्याने प्रयत्न करूनही अनेकांना ‘एमपीएससी’मध्ये अपयश येते. काहीजण खचून जातात, तर काही जण नव्या उमेदीने मार्ग बदलून यशही मिळवतात. सुशील काटकर हे त्यापैकीच एक. या प्रवासाविषयी त्यांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधला. काटकर हे मूळचे बीड जिल्ह्यातील यवता या गावचे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची  होती.  घरी शेती होती पण शेतीतून येणार सगळा पैसे कर्जाचे व्याज फेडण्यात जात होते. काटकर यांच्या आजोबांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांवर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी होती.

Anti Corruption : पाच महिन्यांत शिक्षण विभागातील २१ जण सापळ्यात; आरोपींच्या नावांसह सविस्तर माहिती वाचा

काटकर म्हणाले, " आमच्या गावात कलेक्टर पेक्षा सुद्धा शिक्षक, पोलीस आणि तलाठी यांना जास्त मान होता. त्यामुळे मला शिक्षक व्हायचे होते. १० वी झाल्यानंतर पहिल्यांदा तालुक्याला गेलो होतो. नंतर हळूहळू शिक्षक  होण्यासाठी पुढे काय करावे लागेल हे समजून घेतले. बीएड करायचे होते, पण मार्क कमी होते. मग ग्रॅज्युएशन करून  प्राध्यापक व्हायचे ठरवले.  औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात प्रवेश घेतला. वर्ष २००९-१० मध्ये   अर्थशास्त्र या विषयात एमए केले. मी विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी आहे. पण पुढे शिक्षणासाठी खूप जास्त पैसे लागणार होते. त्यामुळे प्राध्यापक होण्याचेही स्वप्न अर्धवटच राहिले."

माझ्या एका मित्राने मला सांगितले कि फक्त ३५०  रुपये भरून MPSC ची परीक्षा देता येते. त्यात चांगले मार्क पडले तर PSI होता येते. बस मग ठरवले PSI व्हायचे. औरंगाबाद मध्येच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. माझ्या गावापासून औरंगाबाद ५ किमी अंतरावर होते. रोज पायी १० कि.मी. चे अंतर कापत होतो.  पण बाकीच्या खर्चासाठी पैसे लागत होते. वडील ज्वारी विकून मला पैसे देत होते. पण मला MPSC परीक्षेत यश आले नव्हते. घरच्यांचे कष्ट पाहवत नव्हते.  मी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलो. आता घरच्यांना त्रास द्यायचा नाही म्हणून स्वतःचा खर्च स्वतः उचलण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे काटकर यांनी सांगितले.

ज्यांचे वार्षिक उत्पन्न लाखाच्या आत, त्यांनी लाखभर फी आणायची कुठून? पालकांचा आक्रोश

वडापावपासून झाली सुरूवात

इकडून तिकडून थोडे पैसे गोळा करून पुण्यात एक वडापावची गाडी टाकली.  मी जिथे गाडी टाकली होती तिथे सकाळी स्वछता कर्मचारी झाडू मारायला यायचे, त्यांच्याशी बोलून मलाही काही काम मिळेल का विचारले. त्यापैकी एका महिलेने मला कचरा भरून द्यायचे काम सांगितले त्या बदल्यात मला महिन्याला २ हजार रुपये मिळत होते. थोडेफार पैसे घरी पाठवत होतो. पण त्याने काहीच भागणार नव्हते. तशीच परीक्षेचीही तयारी करत होतो. पण मेन्समध्ये पुन्हा अपयश आले. त्यानंतर मी ठरवले आता परीक्षेच्या नादी लागायचे नाही, वडापावची गाडी लावत होतोच त्यावरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले," असे काटकर यांनी सांगितले.

आता काटकर यांचे पुण्यात दोन हॉटेल आहे. आधी त्यांच्या घराला चौकटही नव्हती आता काटकर यांनी गावी स्वतःचे घर बांधले, सर्व कर्ज फेडले. विशेष म्हणजे त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठ येथील हॉटेलला "होय मी MPSC कर, काटकर बंधू" असे नाव दिले असून ते सर्वांचे लक्ष वेधत आहे. वडापावच्या गाडीपासून सुरू झालेला काटकर यांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo