महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज केला का ? 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत 

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसुचनेनुसार, 17 हजार 471 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज केला का ? 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Police Constable Recruitment) 2024 अधिसूचना जाहीर (Notification announced) केली आहे. या अधिसुचनेनुसार, 17 हजार 471 रिक्त जागांसाठी (17 thousand 471 vacancies) भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू  (Start the online application process) झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार 31 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार mahapolice.gov.in आणि policerecruitment2024.mahait.org वर अर्ज करू शकतात.

शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या टप्प्यांतून महाराष्ट्र पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी उमेदवार निवडले जातील. पोलिस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन यासह विविध रिक्त पदांसाठी या प्रक्रियेतुन उमेदवार निवडले जाणार आहेत. 

एकूण रिक्त पदांपैकी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 9 हजार 595 पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 1 हजार 686, जेल कॉन्स्टेबलसाठी 1 हजार 800, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबलसाठी 4 हजार 349 आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन पदासाठी 41 जागा राखीव आहेत.