तलाठी भरतीसाठी अर्जांचा पाऊस; तब्बल १० लाख ४१ हजार अर्ज, पुणे जिल्हा आघाडीवर

राज्याचे अपर जमाबंदी आयुक्त व राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी तलाठी पदासाठी आलेल्या ऑनलाईन अर्जांची जिल्हानिहाय माहिती प्रसिध्द केली आहे.

तलाठी भरतीसाठी अर्जांचा पाऊस; तब्बल १० लाख ४१ हजार अर्ज, पुणे जिल्हा आघाडीवर
Talathi Bharti 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात महसलू विभागाकडून (Revenue Department) तलाठी पदाच्या (Talathi Recruitment) ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत अर्जांचा जणू पाऊस पडला असून पाच हजारांपेक्षा कमी जागांसाठी राज्यभरातून तब्बल १० लाख ४१ हजार इच्छूकांनी अर्ज केले आहेत. सर्वाधिक १ लाख १४ हजार अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यातील (Pune District) असून रायगड जिल्हाही मागे नाही. रायगडमधून जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी तलाठी पदासाठी अर्ज भरला आहे.

राज्याचे अपर जमाबंदी आयुक्त व राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी तलाठी पदासाठी आलेल्या ऑनलाईन अर्जांची जिल्हानिहाय माहिती प्रसिध्द केली आहे. त्यानुसार राज्यात तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ जणांनी अर्ज केला आहे. अपेक्षेप्रमाणे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १४ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. एमपीएससीच्या परीक्षेतही पुण्यातील अर्ज सर्वाधिक असतात.

अजित पवारांच्या सुचनेकडे ‘एमआयडीसी’चा कानाडोळा; विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली जोमात

तलाठी परीक्षा तीन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा १७ ते २२ ऑगस्ट, दुसरा टप्पा २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर, आणि तिसरा टप्पा ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील प्रवेशपत्रही जारी करण्यात आली आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी अर्ज केलेल्या जिल्ह्याबाहेरील केंद्र मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षेला जाताना प्रवास खर्चाच्या बोजासह शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे.

पेपरफुटीच्या घटना घडलेले जिल्हे आघाडीवर

वनविभागासह पोलीस भरती व इतर परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना मागील काही महिन्यांत समोर आल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद, नागपूर, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. नगर व बीड या दोन जिल्ह्यांतून तब्बल १ लाख १० हजार अर्ज आहेत. तर नाशिक, धुळे, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यातून एकत्रितपणे दीड लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले आहेत. वन विभागाचे मुख्य केंद्र असलेले व पेपरफुटीचे थेट कनेक्शन असलेल्या नागपूर जिल्ह्यातूनही जवळपास ५८ हजार अर्ज आहेत.

तलाठी पदासाठी जिल्हानिहाय आलेले अर्ज

एकूण – १०,४१,७१३

अहमदनगर – ६१,६३३, अकोला – ६,४०४, अमरावती – ९,२४०, औरंगाबाद – ३२,०८४, बीड – ४८,७७२, भंडारा – १२,२३०, बुलढाणा – ९,८०९, चंद्रपूर – ५६,९३०, धुळे – ३१,९३०, गडचिरोली – ९,०२०, गोंदिया – ९,३३०, हिंगोली – १३,४००, जळगांव – ४८,३३६, जालना – १७,८८६, कोल्हापूर – ११,८४३, लातूर – ८,०३१, मुंबई शहर – ३,७९३, मुंबई उपनगर – ७,६८९, नागपूर - ५७,८७२, नांदेड – १८,१७०, नंदुरबार – ११,१२३, नाशिक - ६८,०३८, उस्मानाबाद – १९,६६६, पालघर – १३,२३८, परभणी – २१,४३३, पुणे – १,१४,६८४, रायगड – १,००,५३७, रत्नागिरी – ३६,८१७, सांगली – १९,३०६, सातारा – ३०,४३६, सिंधुदुर्ग – २७,०७६, सोलापूर – ५८,९७७, ठाणे – १२,१२९, वर्धा – ९,९२७, वाशिम – २,६३६, यवतमाळ – २१,२८८.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo