शैलेश शेळके महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा मानकरी

शैलेश शेळके याने कालीचरण सोलंकर याचा सहा-चार अशा गुणांनी पराभव करुन महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला.

शैलेश शेळके महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा मानकरी

 लातूरच्या औसा येथील टाका गावाच्या शैलेश शेळके याने सोलापूरच्या कालीचरण सोलंकर याचा सहा-चार अशा गुणांनी पराभव करुन महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. रुपये १,००,००० रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्म पूजक - दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा गेल्या १५ वर्षापासून भरविण्यात येत आहेत.

सोलापूर येथील कालीचरण सोलंकर यांनी उपविजेते पद मिळविले. त्यांना रौप्यपदक व ७५,००० रोख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. रामेश्वर (रूई) येथील भरत कराड याला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याला रुपये ५०,००० रोख व कांस्य पदक, देण्यात आले. सोलापूर येथील अजय खरात याला चतुर्थ क्रमांकाचे २५,००० रुपये रोख व पदक देण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण २४४ मल्लांनी भाग घेतला होता.

हिंदकेसरी दीनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम कराड, काशीराम कराड, आमदार रमेशअप्पा कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, डॉ. हनुमंत कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, राजेश कराड, डॉ. पी.जी.धनवे व वस्ताद पै. निखिल वणवे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.