विद्यार्थ्यांनी साकारली नावीण्यपूर्ण शेतीपुरक उपकऱणे; पुण्यातील दोन शाळांना पुरस्कार

जैन हिल्स येथे आयोजित ‘फाली’च्या नवव्या संमेलनाचा गुरूवारी समारोप झाला. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन अध्यक्षस्थानी होते.

विद्यार्थ्यांनी साकारली नावीण्यपूर्ण शेतीपुरक उपकऱणे; पुण्यातील दोन शाळांना पुरस्कार
FALI Convention Award Ceremony

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

असोसिएशन ऑफ फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडियातर्फे (FALI) जळगावमध्ये (Jalgaon) ‘फाली ९’ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र (Maharashtra) व गुजरातमधील (Gujrat) १५५ शाळांमध्ये १ हजार ८५ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. शेतीपुरक नाविण्यपूर्ण उत्पादने, उद्योग, उपकरणांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सर्वांचीच मने जिंकली. यामध्ये पुण्यातील दोन शाळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जैन हिल्स येथे आयोजित ‘फाली’च्या नवव्या संमेलनाचा गुरूवारी समारोप झाला. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी संमेलनात ३१ इन्होव्हेशन व बिझनेस प्लॅन सादर केले. यात बायोडिझेल फॉर्म, बांबू शेती व त्याची उत्पादने, मल्टी व्हिटामिन पावडर, आवळा शेती आणि त्याची उत्पादने, आयुर्वेदीय शेती, मधमाशी पालनातून मधाचे संकलन, कापड निर्मिती, नारळाच्या करवंटीपासून शोभेच्या वस्तू, मनुका तयार करणे, तृणधान्यापासून कुरकुरे, भाजी व फळे निर्जिलीकरण अशी मॉडेल सादर करण्यात आली होती.

Anti Corruption : पाच महिन्यांत शिक्षण विभागातील २१ जण सापळ्यात; आरोपींच्या नावांसह सविस्तर माहिती वाचा

बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेते

हर्ब रिच बनाना - नवमहाराष्ट्र विद्यालय पांढरे, जि. पुणे (प्रथम)

फिंगर क्रंची स्नॅक्स - कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे जि. सांगली (द्वितीय)

ब्रूम ग्रास फार्मिंग अॅण्ड ब्रूम प्रॉडक्शन - वसंतराव नाईक हायस्कूल जरूड जि. अमरावती (तृतीय)

जादुई पेरू - सोमेश्वर विद्यालय, अंजनगाव जि. पुणे (चतुर्थ)

सेंद्रिय गुळ पेढा - निगमानंद विद्यालय, तळणेवाडी जि. बीड (पाचवा) क्रमांकाने विजयी झाले.

अखेर गणवेशावरून सरकार तोंडघशी; निर्णय बदलण्याची वेळ, शासन आदेश आला 

इन्होव्हेशन स्पर्धेतील विजेते

द्राक्ष फवारणी मॉडेल - न्यू इंग्लिश स्कूल रिधोरे जि. सोलापूर (प्रथम)

स्मार्ट इरिगेशन सिस्टीम्स - प्रभात हायस्कूल पुसला जि. अमरावती (द्वितीय)

ट्रान्सप्लान्टींग मशिन - श्री. संत मुक्ताबाई विद्यालय शेलगाव जि. पुणे (तृतिय)

न्यू फार्मिंग सिक्युरिटी - न्यू इंग्लिश गर्ल स्कूल मलकापूरर जि. बुलढाणा (चतुर्थ)

कर्मवीर चाळणी यंत्र - अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा (पाचवा)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo