मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वाडिया महाविद्यालयात मिळणार मोफत प्रशिक्षण
कराराअंतर्गत महाविद्यालयामार्फत पुढील सहा महिने बँक, रेल्वे एल. आय सी व इतर तत्सम परीक्षा पूर्व (IBPS) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनीच्या भरतीमध्ये CRP - PO/MT-XIII पदासाठी व स्पेशालिस्ट ऑफिसर CRP - SPL - XIII या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या परीक्षेत अनुसूचित जातीतील (SC) विद्यार्थ्याचा टक्का वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (Barti) तर्फे पुण्यातील नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयासोबत (Ness Wadia college of commerce) करार करण्यात आला आहे.
कराराअंतर्गत महाविद्यालयामार्फत पुढील सहा महिने बँक, रेल्वे एल. आय सी व इतर तत्सम परीक्षा पूर्व (IBPS) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रती महिना सहा हजार रुपये विद्यावेतन तसेच शैक्षणिक साहित्यासाठी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी इयत्ता बारावी ही सैक्षणिक पात्रता असून शंभर विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.
ZP Recruitment : एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास होईल नुकसान, वाचा महत्वाच्या सुचना...
प्रशिक्षणासाठी ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा दिव्यांग (Person With Disability), ५ टक्के जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मांग, मातंग, मांग गारुडी, मादगी, ई.) विद्यार्थ्यांकरिता आरक्षित राहतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट राहील. चाळणी परीक्षा १० सप्टेंबर रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात येईल.
प्रशिक्षण कार्यक्रम प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर व समन्वयक डॉ. लक्ष्मण भैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी - https://barti.maharashtra.gov.in/
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD
eduvarta@gmail.com